प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

सेक्स दरम्यान काही ठराविक गोष्टींची काळजी घेतल्यास Orgasm चा सुखद अनुभव घेता येईल. अनेकदा सेक्स म्हणजे पुरुषांसाठी केवळ वासनेचा विषय असतो. त्यामुळे अशा सेक्सदरम्यान त्यांना महिला जोडीदाराकडून योग्य तो सपोर्ट मिळत नाही आणि पुरुषाला केवळ शरीरसुख मिळते पण सेक्सचा परमोच्च आनंद मिळत आहे. सेक्स साठी पुरुषांचा अति उत्साहीपणा आणि अति घाई अनेकदा या गोष्टीस कारणीभूत ठरते. म्हणतात ना अति घाई संकटात नेई, त्यामुळे सेक्स दरम्यान पुरुषांनी काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

शारीरिक सुखाचा अनुभव जेवढा पुरुषाला हवा असतो तितकाच तो स्त्री ला देखील हवा असतो. त्यामुळे पुरुषाला जर आपल्या महिला जोडीदाराचा सेक्सदरम्यान तितकाच सहभाग हवा असेल तर काही ठराविक चुका त्यांनी टाळल्या पाहिजेत.

पुरुषांनी या चुका सेक्स दरम्यान करू नये

1. महिलांना उत्तेजित न करता सेक्स करु नका

अनेकदा पुरुष स्त्री ला उत्तेजित न करता संभोग करण्यास सुरुवात करतात. अशा वेळी सेक्सचा चांगला अनुभव पुरुषांना मिळत नाही महिला जोडीदाराचाही हिरमोड होतो. Sex Tips: सेक्स स्टॅमिना वाढविण्यासाठी दररोज खा 'ही' Love Fruits, वाचा सविस्तर

2. आपल्या महिला जोडीदाराला सेक्स दरम्यान काय आवडत याबाबात अतिविश्वास बाळगू नका

आपल्या महिला जोडीदाराला सेक्स दरम्यान काय आवडत हे आपल्याला माहित आहे असा अतिविश्वास बाळगू नका. महिलेला सेक्स दरम्यान कोणत्या गोष्टी हव्या आहेत याबाबत तिच्याशी बोला

3. सेक्सचे नियोजन करु नका

सेक्स दरम्यान काय करायचे आहे हे ठरवून सेक्स करू नका. त्यामुळे एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तर तुमची निराशा होईल ज्याचा परिणाम महिला जोडीदारावरही होईल.

4. Foreplay न करता शारीरिक गोष्टीवर जास्त लक्ष देणे

अनेकदा पुरुषांना केवळ शारीरिक संभोग महत्त्वाचा असतो. अशा वेळी ते फॉरप्ले करणे टाळतात. मात्र फॉरप्ले शिवाय सेक्सचा अनुभव चांगला येणार नाही.

5. बेडरूम मधल्या लाइट्स बंद ठेवाव्या

अनेकदा पुरुषांना स्त्रीचे सौंदर्य पाहता यावे यासाठी लाइट्स लावून सेक्स करण्यास आवडतो. मात्र स्त्रियांना स्वत:ला अथवा पुरुषाला त्या अवस्थेत पाहण आवडते असे नाही. त्यामुळे शक्यतो लाइट्स बंद करून प्रणय करावा.

प्रणय क्रिडा करताना महिला जोडीदाराचाही तितकाच सहभाग असला तर परमोच्च सुखाचा आनंद घेता येईल. त्यासाठी पुरुषांनी वर दिलेल्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि सेक्स दरम्यान या चुका करु नका.