आजचे राशीभविष्य, शुक्रवार 19 ऑगस्ट 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
राशी भविष्य- (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

Horoscope Today 19 August: आजचे राशीभविष्य, शुक्रवार 19 ऑगस्ट 2022 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष:  आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.

शुभ उपाय- काळ्या रंगाचे कपडे टाळा.

शुभ दान- पिवळ्या रंगाचे वस्र दान करा

शुभ अंक- 2

शुभ रंग- पिवळा

वृषभ: सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु पैसे साठवण्याची सवय लाभदायी ठरू शकेल.

शुभ उपाय- तुळशीला नमस्कार करा

शुभ दान- गरजूंना मदत करा

शुभ अंक- 3

शुभ रंग- लाल

मिथुन: आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. त्यातूनही नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही कराल.

शुभ उपाय- देवाला गोडाचा पदार्थाचा नैवेद्य दाखवा

शुभ दान- अंथरुण दान करा

शुभ अंक- 6

शुभ रंग- निळा

कर्क: मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा असेल. बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल. जिभेवर ताबा ठेवा.

शुभ उपाय- गणपतीची पूजा करा

शुभ दान- भिक्षुकाला दान करा

शुभ अंक- 9

शुभ रंग- पांढरा

सिंह: घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. धन आणि प्रतिष्ठेची हानी असे कृत्य करू नका. स्त्रियांशी व्यवहार करताना सावध राहा.

शुभ उपाय- देवाला दुधाने स्नान घाला

शुभ दान- पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करा

शुभ अंक-7

शुभ रंग- आकाशी

कन्या: घरातील व्यक्तींसमवेत वेळ आनंदात जाईल. धनलाभाचा योग आहे. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल.

शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.

शुभ दान- पिवळ्या रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- पिवळा

तुळ: ताणतणाव, दडपणाच्या मनःस्थितीवर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. तसेच तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली येण्याची शक्यता आहे. जोडीदाराची काळजी घ्या.

शुभ उपाय- शंकराची पूजा करा

शुभ दान- कुत्र्याला जेवण द्या

शुभ अंक- 5

शुभ रंग- पोपटी

वृश्चिक: आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची भीती आहे. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील.

शुभ उपाय- अपशब्द तोंडातून निघणार नाही याची काळजी घ्या

शुभ दान- जेवण दान करा

शुभ अंक- 4

शुभ रंग- केशरी

धनु: व्यापारात लाभाची शक्यता. गृहस्थी जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात प्रेमभावना वाढेल. शुभ दिवस

शुभ उपाय-स्नान झाल्यावर देवाची पूजा करा

शुभ दान- शक्य असल्यास रक्तदान करा

शुभ अंक-5

शुभ रंग- करडा

मकर: कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. संततीशी चर्चा होईल. घरातील सदस्यांचे सल्ले ऐका.

शुभ उपाय- घरात लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा.

शुभ दान- गाईला जेवण द्या.

शुभ अंक- 1

शुभ रंग- जांभळा

कुंभ: गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. मानप्रतिष्ठा भंग पावेल.

शुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा.

शुभ दान- गरजूला एखादे भांडे दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- गुलाबी

मीन: आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांशी भेट होईल. दिवस आनंदात व्यतीत कराल.

शुभ उपाय- जेवणानंतर गोड खा.

शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- निळा