राशी भविष्य- (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

17 सप्टेंबर 2021 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष: मेष राशीतील व्यक्तींनी आज जमीन संबंधित कामे करताना सावधगिरी बाळगावी. आरोग्य उत्तम राहील. काल्पनिक दुनियेत रमाल मात्र लक्षात घ्या ते सत्य नाही.

शुभ उपाय- महालक्ष्मीची पूजा करा

शुभ दान- खडीसाखर दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- गुलाबी

वृषभ: आजच्या दिवशी तुम्ही भावनाशील राहाल. प्रॉपर्टी संदर्भात विचारपूर्वक काम करा. दुपार नंतर मित्रपरिवारासह बाहेर जाता येईल.

शुभ उपाय- हनुमानाची पूजा करा

शुभ दान- काळे वस्त्र दान करा

शुभ अंक- 1

शुभ रंग- करडा

मिथुन: मिथुन राशीतील व्यक्तींनी आज नोकरीच्या ठिकाणी सावधानता बाळगावी. घरातील मंडळींची साथ लाभेल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल.

शुभ उपाय- श्रीकृष्णाची पूजा करा

शुभ दान- हिरव्या रंगाचे वस्त्र दान करा

शुभ अंक- 5

शुभ रंग- पिवळा

कर्क: आज तुमची सर्व कामे पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांची साथ लाभेल. आरोग्य उत्तम राहील आणि घरात सुख-शांती लाभेल.

शुभ उपाय- दही खाऊन घराबाहेर पडा

शुभ दान- दूध दान करा

शुभ अंक- 3

शुभ रंग- हिरवा

सिंह: सिंह राशीतील व्यक्तींनी पैशाच्या बाबत विचारपूर्वक खर्च करा. रागावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीसह वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.

शुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा

शुभ दान- गहू दान करा

शुभ अंक- 2

शुभ रंग- निळा

कन्या: कन्या राशीतील व्यक्ती आजचा दिवस थोडा कठीण असेल. मानसिकरित्या तयार रहा. व्यवसायात अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

शुभ उपाय- पक्ष्यांना खाद्य खाला

शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या

शुभ अंक- 7

शुभ रंग- पांढरा

तुळ: तुळ राशीतील व्यक्तींनी निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. आज कामधंद्यात पैशांची चणचण भासेल. आई-वडिलांची साथ लाभेल.

शुभ उपाय- दुर्गेची पूजा करा

शुभ दान- तांदूळ दान करा

शुभ अंक- 1

शुभ रंग- केशरी

वृश्चिक: या राशीच्या व्यक्तींना आज सगळ्या कामात यश मिळेल. प्रॉपर्टीची कामे करण्यासाठी उत्तम दिवस आहे. कोणत्यातरी नातेवाईंकाची भेट होईल.

शुभ उपाय- हनुमानाची पूजा करा

शुभ दान- मसूर दान करा

शुभ अंक- 4

शुभ रंग- हिरवा

धनु: धनु राशीतील व्यक्तींना आज नोकरीच्या ठिकाणी त्रास सहन करावा लागेल. भांडण करण्यापासून दूर रहा. खाण्यावर नियंत्रण ठेवा.

शुभ उपाय-वडाच्या झाडाला पाणी अर्पण करा

शुभ दान- फळ दान करा

शुभ अंक- 9

शुभ रंग- जांभळा

मकर: आजचा दिवस तुमचा आनंदात जाईल. बाहेर फिरण्यास जाण्यास वेळ काढा. प्रिय व्यक्तीचा आदर करा.

शुभ उपाय- गोड खाऊन कामाची सुरुवात करा

शुभ दान- मिठाई दान करा

शुभ अंक- 7

शुभ रंग- गुलाबी

कुंभ: खूप दिवसांपासून रखडलेली कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल. प्रिय व्यक्तीशी भेट होईल.

शुभ उपाय-हनुमान चालीसा वाचा

शुभ दान- काळे तिळ दान करा

शुभ अंक- 5

शुभ रंग- सोनेरी

मीन:  आजचा दिवस अनेकप्रकारे महत्वाचा ठरेल. विचारपूर्वक कामे करा. इतरांच्या बोलण्याला भुलू नका, प्रिय व्यक्तीसोबत भांडण करणे टाळा.

शुभ उपाय- चंदनाचा टिळ लावा

शुभ दान- पीठ दान करा

शुभ अंक- 6

शुभ रंग- गुलाबी