तुमच्या गर्लफ्रेंडची वैशिष्ट्ये सांगातत त्यांचे भविष्य; काय निवडणार करीअर? कोणाची होणार पत्नी? घ्या जाणून
Girlfriend Features Astrology | (Photo courtesy: archived, edited images)

गृहित धरतो की आपल्याला गर्लफ्रेंड (Girlfriends) आहे. नसली तरीही हरकत नाही. योग्य कर्म केल्यास नजीकच्या काळात गर्लफ्रेंडसोबत फिरण्याची संधी आपल्यालाही मिळू शकते. त्यामुळे सध्यास्थितीत माहिती म्हणूनही हा मजकूर तुम्ही वाचू शकता. तर, सांगायाच मुद्दा हा की, प्रत्येक व्यक्तिचे एक व्यक्तिमत्व असते. ज्यात त्याच्या सवयी आणि चेहरा, हात, पाय त्यांवरील रेषा, ओठ, डोळे, नाभी, बोटे, नाक कपाळ अशा अनेक अवयवांवरील वैशिष्ट्यांचा समावेश होतो. या वैशिष्ट्यांबाबत ज्येतिषशास्त्र (Astrology) भाष्य करते. ज्यामुळे त्यांच्या भविष्याबाबत काही अंदाज व्यक्त करता योतो. ज्योतिषशास्त्रातील काही तज्ज्ञ हे प्रामुख्याने हस्तरेषा (Palmistry) तज्ज्ञ असतात. यातील काही तज्ज्ञ समुद्रशास्त्रातही पारंगत असतात. अशाच काही तज्ज्ञांनी महिला आणि मुलींच्या काही वैशिष्ट्यांबाबत भाष्य केले आहे. या वैशिष्यांबाबतचे भाष्य जाणून घ्या आणि तुमच्या गर्लफ्रेंडमध्ये त्या गोष्टी आहेत का ते पाहा, तुमचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल. अर्थात, इथे दिलेली माहिती ही केवळ काही संकेत आणि तज्ज्ञांनी केलेल्या भाष्यावर अधारीत आहे. त्यामुळे वास्तव रुपात या गोष्टी अंशत: किंवा पूर्णत: तंतोतंत लागू पडतीलच असा दावा लेटेस्टली करत नाही. वाचकांनीही हा मजकूर वाचल्यावर आपल्या सदसद विवेकबुद्धीने त्यावर विचार करावा, असा आमचा सल्ला आहे. जाणून घ्या गर्लफ्रेंडची वैशिष्ट्ये (Characteristics Of Girlfriends) आणि त्यांचे भविष्य (Girlfriend Features).

गुलाबी ओठ, लाल जीभ

समुद्रशास्त्र सांगते की, गुलाबी ओठ, लाल जीभ आणि वाणीत गोडवा असलेल्या स्त्रीचे वैवाहिक जीवन सुखी असते. ती आपल्या जोडीदाराला नेहमी आनंदी ठेवते.

खोल बेंबी (Navel)

खोल बेंबी आणि त्याच्या अजूबाजूला तिळ किंवा चामखीळ असणारी स्त्री ही होतकरू असते. ती तिच्या हिमतीवर लढण्यास प्राधान्य देते. अशा स्त्री सोबत असलेल्या पुरुष जोडीदारास तिच्या सोबत असण्याचा फायदा होतो. अनेकदा अशा स्त्रीच्या यशाचे क्रेडीट अनेकदा तिच्या जोडीदाराला मिळते.

गालावर खळी

हसताना ज्या मुलीच्या गालावर खळी पडते अशी स्त्री चालण्याबोण्यात अत्यंत हुशार असते. तिचा आपल्या विवेकबुद्धीवर कमालीचा विश्वास असतो. ती मोकळ्या मनाची असते आणि तिला नेहमी संवाद करायला आवडते. असा व्यक्ती सोबत असल्याने वातावरण आनंदी होते. वाटचालीत एक आत्मविश्वास निर्माण होतो. पण, अशा मुली मनाला लाऊन घेणाऱ्या असतात. त्यांच्या भावना तुम्ही जितक्या जपाल तितका त्या तुम्हाला अधिक आनंद देतील.

डोळ्यात लालसरपणा

ज्या मुलींच्या डोळ्याच्या पांढऱ्या भागात लालसर किंवा तांबूसपणा असतो त्यां मुली, महिला आयुष्यात सुखी असतात. कठीण, अडचणीच्या प्रसंगातही त्या आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात. गंमत म्हणजे त्यांच्याकडे वरवर पाहता त्या रागीट स्वभावाच्या वाटतात. पण, मुळात त्या मृदू स्वभावाच्या असतात.

पायांवर चिन्ह

अनेक महिला, मुलींच्या पायावर कमळ, शंख किंवा अशाच प्रकारचे साधर्म्य दाखवणारे चिन्ह दिसते. अशा मुली लक्षवेधी असतात. त्यांचा समोरच्यावर पटकन प्रभाव पडतो. अशा मुली स्वत: उच्चाधिकारी म्हणून नाव कमावतात किंवा त्यांना उच्चाधिकारी पती लाभतो. (हेही वाचा, प्रेमविवाह केला आहे? की करायचा आहे? जाणून घ्या फायदे तोटे)

नाकावर तीळ

नाकावर तीळ असणारी महिला ही राणीसारखी असते. ती जीथे असेल तिथे ती आरामतच जीवन जगते. भलेही ती श्रीमंत असो किंवा गरीब. तिला त्यात्या वातावरणाप्रमाणे मोठेपणा मिळतो. सर्व लोक तिचा आदर करतात. मुळात असा स्त्रीया खुशालचेंडू म्हणजे दुनियेचे टेन्शन न घेता आहे त्यात आनंद माणणाऱ्या असतात. या मुली, महिला भविष्याबाबत फार विचार करत नाहीत. त्यांचा वर्तमान काळच इताका सुंदर असतो की, त्यांना भविष्याची चिंता सतावत नाही. यांचे आयुष्यही आनंदी असते.