2020 मध्ये कोणत्या राशींवर होणार 'शनि' चा परिणाम तर कोणाला होणार फायदा, जाणून घ्या
राशी भविष्य- (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

आयुष्यात सुख शांती मिळवण्यासाठी शनि ची कृपा असणे फार महत्वाचे आहे. शनिची पिढा ज्याच्या पाठी लागते अशा व्यक्तीचे आयुष्य दुखाने भरुन जाते असे मानले जाते. यामध्ये आर्थिक चणचण, घरात अशांति, अपयश, आजारपण यासारख्या विविध समस्या उद्भवू लागतात. मात्र 2020 मध्ये शनिची चाल बदलणार आहे. त्यामुळे जाणून घ्या 2020 मध्ये कोणत्या राशींवर होणार शनिचा परिणाम तर कोणाला होणार फायदा.

मेष: शनिची कृपा या राशीवर वर्षभर राहणार आहे. या राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये यश मिळणार असून धनसंपत्ती लाभणार आहे.

वृषभ: या राशीमधील व्यक्तींना नव्या वर्षात काही कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. पण शनिची कृपा राहणार असून समस्या दूर होणार आहेत. त्याचसोबत धनाचा अभाव सुद्धा राहणार नाही.

मिथुन: मिथुन राशीच्या व्यक्तींना आरोग्या संबंधित नव्या वर्षात समस्या येऊ शकतात. परिवारातील आयुष्यात दूरावा येऊ शकतो. मात्र करियर मध्ये स्थिरता राहणार आहे.

कर्क: या राशीमधील व्यक्तींच्या आयुष्यात नव वर्षात शनिची कृपा राहणार आहे. विवाह आणि उद्योगधंद्यात वाढ होार आहे.

सिंह: शनिमुळे तुमच्या आयुष्यातील संघर्ष वाढणार आहे. करियरमध्ये फार मेहनत करावी लागणार आहे. तर वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात.

कन्या: या राशीमधील व्यक्तींना शनिची कृपा करणार असून तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. करियरमध्ये सुधारणा होणार आहे.

तुळ: नव्या वर्षात शनिची कृपा राहणार असली तरीही समस्या असणारच आहेत. मात्र करियर आणि धनाच्या बाबत कृपा करणार आहे. परंतु आरोग्यासंबंधित आजार उद्भवू शकतात.

वृश्चिक: शनिची साडेसाती कमी होणार असल्याने या राशीच्या व्यक्तींना दिलासा मिळणार आहे. मात्र व्यक्तींनी अहंकार कमी करा.

धनु: या राशीतील व्यक्तींना शनिची कृपा असली तरीही फार मेहनत करावी लागणार आहे. मात्र नात्यात आणि परिवारात दूरावा येण्याची शक्यता आहे.

मकर: शनि तुमच्यावर कृपा करणार आहे. मात्र जर तुम्ही करिअरमध्ये दुर्लक्ष करत असल्यास त्यामध्ये अडथळा येऊ शकतो. संपत्तीच्या बाबत सुद्धा समस्या येणार आहेत.

कुंभ: तुमच्या जीवनात फार मोठा शनिमुळे बदल होणार आहे. शिस्त आणि प्रामाणिकपणामुळे लाभ होऊ शकतो.

मीन: या वर्षात मीन राशीमधील व्यक्तींना शनिची भरपूर लाभ होणार आहे. त्यामुळे धन आणि करियरमध्ये प्रगती कराल. मात्र तुमचे आरोग्य आणि खाण्यापिण्याबाबत शिस्त बाळगा.