Maharashtra Travel Places: फेब्रुवारी महिन्यात फिरण्यासाठी उत्तम ठिकाण, जाणून घ्या माहिती
Winter Tourism | Representational image (Photo Credits: pxhere)

Maharashtra Travel Places: जगात काही अशी लोक आहेत त्यांना फिरणं हा एक उत्तम छंद वाटतो. खरं तर डॉक्टरांच्याही मते, आपल्या शरिराची हालचाल व्हावी आणि मन प्रसन्न रहावं याकरिता फिरणं हे महत्त्वाचे ठरते.   शहराच्या बाहेर फिरण्यासाठी कुठे जायचं आहे असा प्रश्न पडला असेलच ना? फेब्रुवारी म्हटलं की प्रेमाचा महिना. या महिन्यात कुठं तरी फिरण्यासाठी जाण्याचं मन तर, सगळ्याच करत. थंडीचा शेवटा महिन्यात जवळपास फिरण्यासाठी काही अशी ठिकाणं आहे जे निसर्ग प्रेमींसाठी उत्तम आहेत. काम करून कंटाळा आला असेल तर थकवा दुर करण्यासाठी आणि थंड वातावरणचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी नक्कीच भेट द्या, या दिवसांत राज्यातील कोकण हे उत्तम पर्याय आहे सोबत साताऱ्यातील काही प्रसिध्द ठिकाण जे पाहून तुम्हाला प्रसन्न वाटेल. जाणून घ्या आपल्या कुटुंब किंवा पार्टनर सोबत या दिवसांत कुठे फिरु शकतो.

१. गणपतीपूळे

मुंबईपासून ३७५ किमी लांब असलेलं गणपतीपूळे हे गणपतीचं मंदिर समुद्र किनाऱ्यावर वसलेलं आहे. गणपतीपूळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिध्द ठिकाण आहे. फॅमिलीसोबत जायचं असेल तर हा उत्तम पर्याय आहे. गणपतीपूळे हे देशातील आठ गणपती मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर पेशवाकालीन अती प्राचीन मंदिर आहे.

२. महाबळेश्वर -

मुंबई शहरापासून २६३ किलोमीटर अंतरावर वसलेलं महाबळेश्वर हे ठिकाण प्रत्येकांने पाहवं. देशातील सुंदर हिल स्टेशन पैकी एक म्हणजे महाबळेश्वर. आपल्या पार्टनर किंवा मित्र मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी जायचं असेल तर या निर्सगरम्य वातावरणात जाऊ शकता.

३. आरे-वारे बीच

समुद्र किनारी फिरण्यासाठी जायचं असेल तर हा बीच एक उत्तम पर्याय आहे. हा बीच कोकण विभागात येतो. कोकणात फिरण्यासाठी जायचं असेल तर या ठिकाणी एकदा येऊन हा बीच पाहू शकता. हा बीच आणि परिसरत स्वच्छ आहे आणि वर्दळ नसल्यामुळे हा बीच तुम्हाला नक्कीच आवडेल.