सणासुदीला घर घेतायत? तर लक्षात राहू द्या 'या' गोष्टी
गृह खरेदी (फोटो सौजन्य- Pixabay)

प्रत्येक जण हा कोणत्या ना कोणत्या सणाला सोन्यापासून ते घरासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची खरेदी करण्याच्या मागे लागतो. त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या सणाला तुम्ही घर घ्यायचे ठरवत असाल तर लक्षात राहू द्या या काही गोष्टी.

1. रियल इस्टेट बद्दल बोलायचे झाले तर शहरात काही बिल्डिंगचे प्रकल्प अजूनही विकले गेले नाही आहेत. त्यामुळे या प्रकल्पांची विक्री होण्यासाठी बिल्डर्सकडून अशा सणासुदीच्या वेळी लोकांना विविध प्रकारे ऑफर्स आणि सोई-सुविधांची बुरळ पाडून घर घेण्यास भाग पाडतात. तर ऐन सणाच्या वेळी घर घेताना थोडी सावधगिरी बाळगा.

2. सण असल्यामुळे अनेक जण नव घर खरेदी करण्याचा विचार करतात. त्यामुळे बिल्डर्स अशा लोकांना खूप ऑफर्स नवीन घरावर उपलब्ध करुन देतो. मात्र एनसीआरच्या प्रकल्पांमध्ये अशा विविध ऑफर्स तुम्हाला दिल्या जातात. परंतु एनसीआरचे काही प्रकल्प अजूही बंद ठेवण्यात आले आहेत.

3.  बिल्डरकडून नवीन घरावर ग्राहकांना जीएसीटीवर सूट दिली जाते. मात्र जीएसटीवर दिलेली सूट ही तेव्हाच उपयोगी पडते जेव्हा दिलेल्या सूटचा जीएसीटीशी काहीही संबंध येत नाही. तसेच पूर्ण बांधकाम झालेल्या घरांवर जीएसटी लागू केली जात नाही. त्यामुळे जर जीएसटीची किंमत कमी असल्यावरच ही नवीन घराची डील कमी किंमतीत करता येते.

4. ऐन सणाच्या वेळी बिल्डर्स लोक नवीन घर घेणाऱ्या ग्राहकांना गाडी, परदेशी सहल, घराचे डिझाईन किंवा फ्री क्लब मेंबरशिप देऊ केली जाते. मात्र बिल्डर्सकडून देण्यात येणाऱ्या या भेटवस्तूंचा खरच उपयोग आहे का हे ग्राहकाने तपासून घ्यावे. उलट घर खरेदी करताना पैशांची सूट मिळत आहे का हे ग्राहकाने पाहावे.

5. नवीन घर घेण्यासाठी खूप आधीपासून त्यावर विचार करावा लागतो. तसेच घर घेताना कुठे घ्यायचे, कोणत्या पद्धतीमधील घर प्रकल्प आहे. तर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत हे पाहावे लागते. तसेच नवीन घेणारे घराची जागा ही अधिकृत आहे की नाही हे सुद्धा तपासून घेणे खूप महत्वाचे ठरते. त्यामुळे सणासुदीला नवीन घर घेत असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.