Indian Coast Guard Day 2024 Message in Marathi: भारतामध्ये दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी 'भारतीय तटरक्षक दिन' (Indian Coast Guard Day 2024) साजरा केला जातो. या विशेष प्रसंगी, देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांना सन्मानित केले जाते. भारतीय तटरक्षक दल हे देशाच्या सागरी सुरक्षेसाठी एक महत्त्वाचे दल आहे, जे सागरी क्षेत्रांचे संरक्षण, चाचेगिरी आणि तस्करी रोखण्यात आणि सागरी आपत्तींपासून संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. अशा सैनिकांना त्यांच्या शौर्य आणि बलिदानासाठी सन्मानित करण्यासाठी भारतीय तटरक्षक दिन साजरा केला जातो.
भारतीय तटरक्षक दलाची स्थापना 1 फेब्रुवारी 1977 रोजी सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी करण्यात आली. तेव्हापासून, भारतीय तटरक्षक दिन दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या वर्षी म्हणजेच 1 फेब्रुवारी 2024 रोजी भारत भारतीय तटरक्षक दिनाचा 48 वा वर्धापन दिन साजरा करेल.
भारतीय तटरक्षक दल हे भारताचे एक सशस्त्र दल आहे, जे भारतीय सागरी सीमा आणि किनारी भागांचे संरक्षण करते. आपल्या देशाची सागरी सीमा सुमारे 7500 किलोमीटर लांब असून तिचे संरक्षण भारतीय तटरक्षक दलाचे जवान करतात. या दलाकडे सध्या 150 हून अधिक जहाजे आणि 100 हून अधिक विमाने आहेत, जी त्यांना विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक क्षमता प्रदान करतात.
तर भारतीय तटरक्षक दिनानिमित्त, काही खास Messages, WhatsApp Status, Greetings, Wishes शेअर करत द्या शुभेच्छा.
दरम्यान, तटरक्षक दलाच्या स्थापनेवेळी दलाकडे फक्त दोन जहाजे आणि पाच गस्ती नौका होत्या. यासोबतच या दलाचे पहिले महासंचालक ॲडमिरल व्हीए कामथ हे होते. आता दलाकडे सुमारे 156 जहाजे आणि 100 विमाने आहेत. भारतीय तटरक्षक दल भारतीय नौदल, मत्स्यव्यवसाय विभाग आणि राज्य पोलीस दलांसोबत सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी जवळून काम करते. हे दल भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करते आणि सागरी मार्गांमध्ये होणाऱ्या बेकायदेशीर कारवायांना प्रतिबंध करते. तसेच ते मच्छीमारांना समुद्रात मदत करते आणि सागरी जैवविविधता टिकवून ठेवण्याचे काम करते. सागरी मार्गाने होणाऱ्या दहशतवादी कारवाया असोत किंवा अंमली पदार्थांची तस्करी असो, भारतीय तटरक्षक दलाचे जवान प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून असतात.