Horoscope Today राशीभविष्य, रविवार 3 मार्च 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope Today

Horoscope Today 3rd March 2024 in Marathi: आजचे राशीभविष्य, रविवार 3 मार्च 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष (Aries Horoscope Today): मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुखाचा आहे. मात्र आपल्या पती/पत्नी बरोबर काही मतभेद होण्याचे संकेत आहेत. आज  स्वास्थ्य विषयक उतार चढाव अनुभवाल. व्यवसाय-धंद्यामध्ये समाधानकारक यश मिळेल.

शुभ उपाय- सकाळी गणपतीची पूजा करा.

शुभ दान- गरजूला आर्थिक मदत करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- निळा

वृषभ (Taurus Horoscope Today): उच्च शिक्षणासाठी हा काळ उपयुक्त आहे. समाधानकारक यश मिळायची शक्यता. आरोग्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी आजचा दिवस सुखाचा जाईल. जर तुम्हाला एखादा जुना आजार त्रास देत असेल, तरी या वर्षी त्यात नक्की सुधारणा होईल. प्रेमजीवन उत्तम असेल.

शुभ उपाय- सकाळी सूर्याला अर्घ्य द्या.

शुभ दान- एखाद्या काचेच्या वस्तूचे दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- हिरवा

मिथुन (Gemini Horoscope Today): आज बारीकसारीक मतभेद होण्याची शक्यता. वाद टाळणे उपयुक्त ठरेल. आजचा दिवस नोकरी धंद्याच्या दृष्टीने श्रेयस्कर असेल. व्यापार धंद्यात गुंतलेले असाल, तर भरपूर परिश्रमाशिवाय फळ मिळणार नाही. आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस अनुकूल असेल.

शुभ उपाय- सकाळी कुलदेवतेची पूजा करा.

शुभ दान- वस्त्रदान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- जांभळा

कर्क (Cancer Horoscope Today): आज मोसमी आजारांपासून सावध रहा. शक्यतो प्रवास टाळा. प्रेमाविषयी कोणत्याही बाबतीत आडमुठेपणा करू नये. आज उत्पन्नाची साधने वाढण्याची शक्यता. परंतु धोकादायक गुंतवणुकीपासून सावधान असावे.

शुभ उपाय- शक्य असल्यास पिंपळाची पूजा करा.

शुभ दान- दही-भाताचे दान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- आकाशी

सिंह (Leo Horoscope Today): आज काही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता. त्यामुळे मानसिक संतुलन बिघडू शकेल. कुटुंबियांमध्ये क्लेष निर्माण होण्याचे संकेत आहेत. आजचा काळ आरोग्य, नोकरी, शिक्षण व प्रवास यांसाठी अनुकूल नाही. आपले स्वास्थ्य तुम्हाला सांभाळावे लागेल.

शुभ उपाय- गायत्री मंत्राचा जप करा.

शुभ दान- गायीला चारा द्या.

शुभ अंक- 2

शुभ रंग- केशरी

कन्या (Virgo Horoscope Today): आज वरिष्ठाबरोबर वाद टाळा, तसेच अनावश्यक प्रवासही टाळा. आज धार्मिक व आध्यात्मिक कार्ये तुम्हाला सुख व शांती देतील. उच्च शिक्षणाच्या दिशेचे प्रयत्न भविष्यात फायद्याचे ठरतील. आजचा दिवस आत्मचिंतनात व्यतीत करावा, अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील.

शुभ उपाय- सकाळी शंकराची पूजा करा.

शुभ दान- धातूचे दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- पिवळा.

तुळ (Libra Horoscope Today): आज आप्तांचा व नातेवाईकांचा आधार लाभेल. हा काळ अपत्य, शिक्षण, प्रवास यांसाठी अनुकूल आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्या. आज नवीन व्यवसायाच्या संधी चालून येतील. विचारपूर्वक गुंतवून करा.

शुभ उपाय- एखादी चांदीची वस्तू स्वतःजवळ ठेवा

शुभ दान- पक्ष्यांना दाणे द्या

शुभ अंक- 6

शुभ रंग- गुलाबी

वृश्चिक (Scorpio Horoscope Today): आज घरातील वातावरण सुखावह असेल. तुम्ही सुखी, समाधानी व निरोगी राहाल. परंतु जीभेवर ताबा ठेवणे शहाणपणाचे ठरेल. तसेच, अनावश्यक खर्च करू नयेत. व्यवसायवृद्धीचे नवे मार्ग दिसतील. आज खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

शुभ उपाय- मंदिरात तेलाचा दिवा लावा.

शुभ दान- पांढऱ्या रंगाची वस्तू अथवा वस्त्र दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- पांढरा

धनु (Sagittarius Horoscope Today): आजचा दिवस संमिश्र असेल. आज स्वास्थ्य विषयक काळज्या मिटतील. आजचा दिवस प्रेम विषयक बाबींसाठी अनुकूल आहे. परंतु, वैवाहिक जीवनात काही उतार चढाव येतील. इतर कोणाचे दावे, खटले, कोर्ट प्रकरणे यांमध्ये अडकू नये. व्यावसायिक पातळीवर देखील अडचणींना तोंड द्यावे लागेल. पण त्या अडचणींवर मात करून तुम्ही यश मिळवाल.

शुभ उपाय- वाहत्या नदीमध्ये नाणे सोडा.

शुभ दान- इच्छेनुसार पैसे दान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- हिरवा

मकर (Capricorn Horoscope Today): आज यश प्राप्तीसाठी तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागतील. कुटुंबियांचा स्वभाव विचित्र वाटेल, असुरक्षिततेच्या भावनेमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकेल. आज अनावश्यक प्रवास तुमच्यासाठी हितकारक नाही. प्रेम संबंधातही काही बेबनाव येऊ शकतील. थोडक्यात आजचा दिवस विशेष काळजी घेण्याचा दिवस आहे.

शुभ उपाय- वृद्ध ब्राह्मणांसोबत आपले अन्न वाटून घ्या.

शुभ दान- गरजूला उडीद, मूग आणि तूर डाळ दान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- लाल

कुंभ (Aquarius Horoscope Today): आज कुटुंबात सुसंवाद नांदेल. जोडीदाराची साथ लाभेल मात्र तुमच्याच मनात काही नकारात्मक भावना येऊ शकतात. क्षुल्लक बाबींवर वाद टाळावा. व्यावसायिक दृष्ट्या समाधानकारक काळ. विद्यार्थ्यांना परिश्रमाचे फळ मिळेल. गुंतवणुकी सावधानपूर्वक कराव्यात.

शुभ उपाय- सकाळी उठून पूजा करून गणेशाला दुर्वा वाहा.

शुभ दान- पिठाचे दान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- लाल

मीन (Pisces Horoscope Today): आजचा दिवस कडूगोड ठरेल. आर्थिक कार्यांमध्ये उतार-चढाव येतील. कर्ज संबंधित बाबींकडे बारीक लक्ष द्यावे लागेल. काही वाद व खटले यांचेही संकेत आहेत. भागीदारीत काम करीत असाल, तर व्यवसायात फायद्याची शक्यता आहे. उत्पन्न व ज्ञान दोन्ही बाबी वाढण्याचे संकेत. स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याकडे विशेष लक्ष्य द्या.

शुभ उपाय- घरातून बाहेर पडताना थोडे काळे तीळ खिशात बाळगा.

शुभ दान- मंदिरात तेलाचे दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- करडा