
Horoscope Today 25 March 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, शनिवार, 25 मार्च 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.
शुभ उपाय- काळ्या रंगाचे कपडे टाळा.
शुभ दान- पिवळ्या रंगाचे वस्र दान करा
शुभ अंक- 2
शुभ रंग- पिवळा
वृषभ (Taurus Horoscope Today): सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पैसे साठवण्याची सवय लाभदायी ठरू शकेल.
शुभ उपाय- तुळशीला नमस्कार करा
शुभ दान- गरजूंना मदत करा
शुभ अंक- 3
शुभ रंग- लाल
मिथुन (Gemini Horoscope Today): मिथुन राशीतील व्यक्तींनी प्रकृतीकडे लक्ष द्या. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका. आजचा दिवस
शुभ उपाय- गाईला चारा द्या.
शुभ दान- तांदूळ दान करा.
शुभ अंक- 8
शुभ रंग- पांढरा
कर्क (Cancer Horoscope Today): आज मनात बराच गोंधळ असेल. मनात निर्माण होणार्या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा असेल. बोलण्यावर संयम ठेवा. कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल.
शुभ उपाय- गणपतीची पूजा करा
शुभ दान- भिक्षुकाला दान करा
शुभ अंक- 9
शुभ रंग- पांढरा
सिंह (Leo Horoscope Today): सिंह राशीतील व्यक्तींचा आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका. आई-वडिलांची साथ लाभेल. जवळच्या व्यक्तीकडून मिळालेला सल्ला अमलात आणल्यास फायदा होऊ शकेल.
शुभ उपाय- सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करा.
शुभ दान- गाईंना चारा द्या.
शुभ अंक- 5
शुभ रंग- जांभळा
कन्या (Virgo Horoscope Today): कन्या राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवसाची सुरुवात उत्तम होणार नाही. परंतु काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टाळता येऊ शकेल. कामात किंवा व्यवसायात चित्त थाऱ्यावर ठेऊन लक्ष द्या. आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा टाळा.
शुभ उपाय- लक्ष्मीची पूजा करा.
शुभ दान- लाल कापड किंवा नारळ दान करा.
शुभ अंक- 9
शुभ रंग- निळा
तुळ (Libra Horoscope Today): तूळ राशीतील व्यक्तींशी आजचा दिवस उत्तम असणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल. घरातील मंडळींशी आदराने वागा.
शुभ उपाय- जेवणानंतर गुळ खा.
शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.
शुभ अंक- 1
शुभ रंग- पोपटी
वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : ताणतणाव, दडपणाच्या मनःस्थितीवर मात करता येईल, आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. तसेच तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली येण्याची शक्यता आहे. जोडीदाराची काळजी घ्या.
शुभ उपाय- शंकराची पूजा करा
शुभ दान- गरिबाला अन्नदान करा
शुभ अंक- 6
शुभ रंग- पिवळा
धनु (Sagittarius Horoscope Today): खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यास आज मदत मिळेल. कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या. प्रिय व्यक्तीशी आदराने वागा. आई-वडिलांची साथ लाभेल. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरीने वागा.
शुभ उपाय- गाईला चारा द्या.
शुभ दान- मंदिरात वस्त्र दान करा
शुभ अंक- 2
शुभ रंग- पांढरा
मकर (Capricorn Horoscope Today): व्यापारात लाभाची शक्यता. गृहस्थी जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात प्रेमभावना वाढेल. आजचा दिवस शुभ असेल.
शुभ उपाय-स्नान झाल्यावर देवाची पूजा करा
शुभ दान- शक्य असल्यास रक्तदान करा
शुभ अंक-7
शुभ रंग- करडा
कुंभ (Aquarius Horoscope Today): आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. त्यातूनही नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही कराल.
शुभ उपाय- देवाला गोडाचा पदार्थाचा नैवेद्य दाखवा
शुभ दान- अंथरुण दान करा
शुभ अंक- 6
शुभ रंग- गुलाबी
मीन (Pisces Horoscope Today): आज प्रकृतीकडे लक्ष द्या. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका.बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल. आजचा दिवस मध्यम असेल.
शुभ उपाय- घरातून बाहेर पडताना दही-साखर खा.
शुभ दान- गरजूला धातू दान करा.
शुभ अंक- 1
शुभ रंग- पिवळा