प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फाइल फोटो)

How To Have Sex या तरूणाईच्या मनातच्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी तरूणाई Porn ला माहितीचं साधन म्हणून पाहत आहे. एका रिपोर्ट नुसार तरूणाईवर Pornography चं गारूड आहे. पॉर्न व्हिडिओ त्यांना सेक्सबाबत माहिती देऊ शकतात, हे एक मदतीचं प्रभावी साधन असल्याची त्यांची भावना आहे. मात्र दुर्देवाची बाब म्हणजे तरूणाईला पॉर्न बाबत चूकीच्या समजुती आहेत. 'ऑनलाईन उपलब्ध असलेल्या पॉर्नोग्राफी या मोफत असतात. प्रामुख्याने त्या मनोरंजनाच्या कामासाठी आणि क्रिएटर्ससाठी पैसा कमवण्याचं साधन आहेत. ' असे मत बोस्टन युनिर्व्हर्सिटीच्या प्रमुख लेखिका Emily Rothman यांनी संशोधनात म्हटलं आहे.

पोर्न व्हिडिओ हे मूळीच तुम्ही सेक्सचा आनंद घेताना काय करायला हवं याचं शिक्षण देण्यासाठी नाहीत असेही Emily Rothman म्हणाल्या. 'Archives of Sexual Behavior'मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासात रिसर्च टीमने 18 ते 34 वयोगटातील 357 तरूण- तरूणींचे विचार एकून घेऊन त्याचा अभ्यास करण्यात आला. दरम्यान 14-17 वयातील 324 किशोरवयीन मुलांनी सांगितलं त्यांना सेक्स कसा करावा याबाबत त्यामधून माहिती मिळाली.

14-17 वयातील मुलांसाठी त्यांच्या मित्रपरिवारानंतर त्यांचे पालक हे माहितीचे सॉर्स होते. केवळ 8% किशोरवयीन मुलांना पोर्न हे माहितीचे एक साधन वाटले. दरम्यान मुलींपेक्षा मुलांना पोर्न हे एक माहितीचं साधन वाटलं. Sex Tips: Porn Addiction मुळे तुमच्या सेक्स लाईफ मध्ये होतो का बिघाड? जाणून घ्या उत्तर.

दरम्यान public health perspective च्या दृष्टीने पाहिल्यास तरूण पिढीने पॉर्न कडे सेक्स एज्युकेशन म्हणून पाहणं ही चिंतादायक बाब आहे. पण यामुळे आता सेक्यश्युअल एज्युकेशन बाबत, सेक्श्युअल सोशल स्किल बाबत किंवा इंटर पर्सनल कम्युनिकेशन अबाऊट सेक्स हे महत्त्वाचं असल्याचं पुढे आले आहे. सोबतच आता तरूणाईला त्याबाबत शिक्षण देण्यासाठी कोणत्या बाबींचा विचार करावा हे ठरवण्यास मदत झाल्याचं मत संशोधकांनी म्हटलं आहे.