मानसिक ताणतणावाशी झुंज देत आहेत मुंबईकर; आत्महत्यांच्या संख्येमध्ये वाढ
(Photo credits: Pixabay)

मुंबई शहारातील चरकोप भागात असणाऱ्या रॉक रेव्हेन्यू अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 40 वर्षीय डिंपल वाडीलाल यांना नोकरीवरून काढल्यामुळे त्यांनी आपल्या राहत्या इमारतीतून गुरुवारी उडी मारून जीव दिला. त्याआधी, एका अज्ञात 22 वर्षीय युवतीने वर्षाच्या सुरुवातीच्या काळात ठाण्यातील स्कायवॉकवरून उडी मारली आणि तिचा मृत्यू झाला, तर त्या घटनेच्या 10 दिवसांपूर्वी, प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्यामुळे निराश झालेल्या 21 वर्षीय मुलीने स्वतःला फासावर चढवलं.

स्थानिक पोलिस तपासणीत असे आढळले आहे की या सर्व घटनांमागील प्राथमिक कारण मानसिक ताण असल्याचे समोर आले आहे. बेरोजगारी आणि असुरक्षित भविष्य या व्यतिरिक्त प्रेम प्रकरण आणि अवैध संबंधही आत्महत्येचे प्रमुख कारण बनत आहेत. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार मानसोपचार तज्ञ देखील पोलिसांशी सहमत आहेत. चारकोपच्या रक्षा हॉस्पिटलचे एमडी डॉ. प्रणव काबरा यांच्या मते, पीडित व्यक्तींना वेळीच समजावले तर त्यांचे प्राण वाचू शकते. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार मुंबईत आत्महत्या 7.4 टक्क्यांनी वाढल्या आहेत. 15 ते 29 वयोगटातील लोक भारतात अधिक आत्महत्या करीत आहेत.

जनजागृती मोहीम

वडाळा येथील व्यवसायाने वकील असणाऱ्या तरुणीने तीन वर्षांपूर्वी 18 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही बातमी मुंबई पोलिसांच्या फास्ट-पेस ऑफिसर शालिनी शर्मा यांना मिळाली, त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने मुलीचा जीव वाचविला. त्यांनी घटनास्थळावर पोहोचून तिचे कांउसिलिंग केले आणि शेवटी त्या तिचा जीव वाचविण्यात यशस्वी झाल्या. या घटनेने प्रेरित होऊन विविध कारणांमुळे लोकांना नैराश्यात अडकलेल्या लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी मुंबई पोलिस काही काळापासून जनजागृती मोहीम राबवित आहेत.

मुंबईतील ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदड़ा म्हणतात की आर्थिक असुरक्षिततेची भावना, अभ्यासाचा ताण, प्रेमात फसवणूक आणि नशा यामुळे विद्यार्थी आणि खासगी कर्मचारी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. मानसिक तणाव हे आत्महत्येचे मुख्य कारण आहे, जे समुपदेशनाद्वारे पीडितेचे जीवन वाचवू शकते.