IIT-Delhi च्या विद्यार्थ्यांनी महिलांसाठी बनवले खास  'Stand And Pee' Device, पहा काय आहे किंमत आणि खास वैशिष्ट्य
Sanfe (Sanitation for female Photo credit Fabook

World Toilet Day : महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची असलेली कमतरता आणि त्यातही अस्वच्छता अधिक असल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना अस्वच्छ स्वच्छतागृहांमुळे मूत्रमार्गातील संसर्ग (Urinary Tract Infection ) चा धोका अधिक असतो. म्हणूनच यावर उपाय म्हणून Indian Institute of Technology (IIT) दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी World Toilet Day च औचित्य साधत एक खास डिव्हाईस बनवलं आहे. यामुळे स्त्रियांना उभ्याने आणि सुरक्षितपणे मूत्रविसर्जन करणं शक्य होणार आहे.

Sanfe (Sanitation for female) असं या उपकरणाचं नाव आहे. याची यशस्वी चाचणी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात करण्यात आली आहे. या उपकरणाची किंमत केवळ दहा रुपये आहे. अगदीच माफक दरात हे उपकरण उपलब्ध असल्याने समाजातील प्रत्येक स्तरातील महिलेला ते विकत घेणं आणि वापरणं सुलभ होणार आहे. #StandUpForYourself campaign अतंर्गत हे उपकरण देशातील सुमारे लाखभर महिलांना मोफत दिले जाणार आहे.

प्रामुख्याने गरोदर स्त्रिया, गुडघ्याचा त्रास असलेल्या, संधीवाट, आमवाताच्या महिला रुग्णांना याचा फायदा होणार आहे. अनेकदा रेल्वेस्थानक, बसस्थानक किंवा गर्दीच्या ठिकाणी स्वच्छतागृहांमध्ये पुरेशी काळजी घेतली नाही. अशा स्वच्छतागृहांचा वापर अधिक त्रास, आरोग्याच्या समस्या वाढवणारा ठरू नये म्हणून Sanfe महिलांना वरदान ठरू शकते असा दावा . करण्यात आला आहे.