वेदना होत असल्यास पॅरासिटामॉल पेक्षा अधिक उपयुक्त बिअर
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Facebook)

व्यक्तीला आरोग्यासंबंधित कोणताही आजार किंवा वेदना झाल्यास डॉक्टरांचा सल्ला प्रामुख्याने घेतला जातो. तर काहीजण घरच्या घरी औषध म्हणून एखादी गोळी घेतात त्यामुळे थोड्यावेळासाठी त्या आजारापासून सुटका होते. तसेच डोके दुखायला लागल्यास काहीजण पॅरासिटामॉल घेणे पसंद करतात. एका अभ्यासातून असे ही म्हटले आहे की, व्यक्तीला वेदना होत असल्यास पॅरासिटामॉल पेक्षा बिअर अधिक वेगाने काम करते.

ग्रीनविच युनिवर्सिटीतील अभ्यासकांनी असे शोधून काढले की, 400 पेक्षा अधिक लोकांवर अभ्यास करण्यात आला. यामध्ये असे समोर आले की, बिअर वेदनेपासून आराम देण्यासाठी उपयुक्त ठरते. तसेच अल्कोहोल हे वेदना निवारक म्हणून काम करत असल्याचे ही मानले जाते. कमी प्रमाणात बिअर प्यायल्याचे अधिक फायदे होतात. प्रथम म्हणजे रक्तातील अल्कोहोलचा स्तर 0.08 टक्क्यांपर्यंत वाढ होते. दुसरा म्हणजे वेदना कमी करण्यास मदत करते.(मायग्रेन, पोटाचे विकार, खोकला यांसारख्या आजारांवर फायदेशीर ठरेल 'सफरचंद', अशा पद्धतीने करा सेवन)

याबाबात अभ्यास करणारे ड्रॉ टेवर थॉम्पसन असे म्हणतात की, काही पुराव्यामधून असे समोर आले की अल्कोहोल हे बहुतांश प्रमाणात वेदनेवर उत्तम उपाय आहे. कोडीन आणि पॅरासिटामॉल यांच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे. त्यामुळे पेनकिलर घेण्यापेक्षा बिअर पिणे उत्तम पर्याय आहे. मात्र अतिप्रमाणात बिअर पिणे सुद्धा आरोग्यासाठी धोकादायक ठरते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही आजारासंबंधित प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.