प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credits: Pixabay)

Office Stress Management Tips: ऑफिसमधील ताणतणाव (Office Stress) कमी करण्यासाठी काय करायला हवे? याबाबत तुम्ही जर विचार करत असाल तर, आपल्यासाठी आम्ही काही टिप्स सांगत आहोत. या टिप्स योग्य पद्धतीने वापरल्या कदाचित आपला ताण तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते. ऑफिसमधील ताण-तणाव या गोष्टींवर बोलण्यापूर्वी आपण मुळात हा ताण निर्माणच का होतो याकडेही लक्ष दिले पाहिजे. अनेक तज्ज्ञांच्या मते नोकरी, करियर (Career) हे मिळवताना आणि ते टिकवताना निर्माण झालेली स्पर्धा (Competition) हे या ताणतणावाचे प्रमुख कारण आहे. अर्थात यासोबत इतरही अनेक गोष्टी ताणतणाव वाढविण्यास कारणीभूत ठरतात हेही खरे. त्यामुळे जाणून घ्या ऑफिसमधील ताणतणाव कमी करण्यासाठी या काही टिप्स.

कामाचा क्रम लावा

ऑफिसमध्ये कामाचा ताण काहीसा कमी करायचा असेल तर, त्यासाठी कामाचा क्रम लावा. आगोदर अतिमहत्त्वाची कामे, महत्त्वाची कामे, कमी महत्त्वाची कामे आणि बिनमहत्त्वाची कामे अशा पद्धतीने कामाची प्रतवारी लावा. त्यानंतर काम करायला घ्या. तुमच्यावर कामाचा ताण राहणार नाही.

समयसीमा निश्चिती

हाती आलेले काम किती वेळात आणि कशा पद्धतीने पूर्ण करायचे आहे हे ध्यानात घ्या. दिलेले काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ऑफीसमधील काम हे ठरवून दिलेल्या कार्यालयीन वेळेतच पूर्ण करा. अगदीच अतिमहत्त्वाचे काम असेल तर, ऑफिसमध्ये कार्यालयीन वेळेपेक्षा अधिक काळ थांबा. अन्यथा कामाच्या वेळेपेक्षा अधिक काळ ऑफिसमध्ये थांबू नका. ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर अधिकाधिक वेळ हा घर आणि स्वत:साठी द्यायचा प्रयत्न करा.

सहकाऱ्यांशी सौहार्दाचे वातावरण

ऑफिसमध्ये काम करत असताना आपला संपर्क विविध प्रकारचे वर्तन, विचार आणि स्वभाव असणाऱ्या लोकांशी येतो. अशा वेळी अनेकांशी मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करत एकमेकांशी असलेले संबंध सौहार्दाचे ठेवण्याचा प्रयत्न करा. शक्यतो आपल्यापेक्षा अधिक माहितगार व्यक्तीशी संपर्क ठेवा. अज्ञानी लोकांना न दुखवता त्यांच्यापासून दूर राहा. (हेही वाचा, मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आहारात या '९' पदार्थांचा समावेश करा !)

कामाशी दोस्ती करा त्याला आव्हान समजू नका

ऑफिसमधल्या कामाशी मौत्री करा. कारण ते तुम्हाला अधिक प्रमाणात टाळता येणार नाही. किंबहूना ते करण्यासाठीच आपल्याला मोबदला मिळतो. त्यामुळे कामाचा बाऊ करुन त्याला आव्हान समजू नका. कामाशी दोस्ती करा.

आरोग्याकडे लक्ष द्या

ऑफिसचे काम करत असताना अनेक लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही ती चुक करु नका. वेळेवर जेवण, व्यायाम आणि पुरेशी विश्रांती घ्या. जेणेकरुन तुम्ही दिवसभर ताजेतवाणे राहाल. असे केल्याने ऑफिसमधील तुमचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकेल.