Health Tips: रिकाम्या पोटी चहा पिण्याची तुम्हाला सवय आहे का?  तर ही बातमी जरुर वाचा
Tea ( Photo- Pixabay)

चहा न आवडणारी व्यक्ती या जगात क्वचितच पहायला मिळेल.गरमागरम चहाची आवड असणाऱ्या लोकांची या जगात कमतरता नाही. आळस घालवण्यासाठी , झोप उडण्यासाठी अशा अनेक गोष्टींवर रामबाण उपाय म्हणून लोक चहा पिण्याचा पर्याय निवडतात. अदरक, तुळस, लवंग, वेलची,दालचिनी या सारख्या गोष्टी वापरून प्यायलेल्या चहाचे तुम्हाला अनेक आरोग्य लाभ ही होऊ शकतात. मात्र तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी चहा पिण्याची सवय आहे का? तर मग आताच सावध व्हा. कारण उपाशी पोटी चहा पिल्यामुळे तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत रिकाम्या पोटी चहा पिण्याचे तोटे. (Health Tips: नारळ पाणी पिण्यामागे 'ही' वैज्ञानिक कारणे नक्कीच ठरतील तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर )

  • रिकाम्या पोटी चहा पिण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे आंबटपणा. रिकाम्या पोटी गरम चहाचे सेवन केल्याने पोटात आम्लता निर्माण होते आणि पाचन रसांवर परिणाम होतो.
  • पाचन तंत्र कमकुवत होण्याचे प्रमुख कारण म्हणजे रिकाम्या पोटी गरम चहाचा वापर. जरी हे एकदा किंवा दोनदा चहा पिल्याने होत नाही परंतु दररोज रिकाम्या पोटी चहा पिल्याने  होते.
  • रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने तुमची भूक प्रभावित होते किंवा भूक लागणे थांबते. असे झाल्यास आपण आवश्यक पोषणापासून वंचित राहू शकता.
  • जर चहा जास्त प्रमाणात उकळला गेला तर तो आरोग्यासाठी आणखी हानिकारक आहे, कारण त्यात कॅफीनचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्याचा थेट परिणाम रिकाम्या पोटावर होतो.
  • पोट किंवा श्वसनमार्गामध्ये जळजळ, उलट्या किंवा मळमळ या समस्येच्या मूळ कारणांपैकी एक म्हणजे रिकाम्या पोटी चहा पिणे. या समस्या टाळण्यासाठी, चहा पिण्यापूर्वी काहीतरी खाणे आवश्यक आहे.

( सूचना : वर दिलेला मजकूर केवळ माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे )