Health Benefits Of Marigold (PC-Pixabay)

Health Tips: भारतीय संस्कृतीमध्ये झेंडूच्या फुलांचे (Marigold Flowers) मोठे महत्त्व आहे. प्रत्येक सणाला झेंडूच्या फुले आणि  आंब्याच्या पाने घालून तोरण केले जाते. झेंडू ही एक शोभेची फुले देणारी औषधी वनस्पती आहे. झेंडूची फुले अनेक आजारांवर बहुउपयोगी ठरतात. विशेष म्हणजे झेंडू ही संपूर्ण भारतात कोठेही वाढणारी वनस्पती आहे. झेंडूमध्ये पिवळा झेंडू आणि नारिंगी झेंडू, असे दोन मुख्य प्रकार आहेत. झेंडूच्या काही जाती मेक्सिकोमधून भारतात आल्या आहेत. आपल्याला अगदी सहजासहजी उपलब्ध होणारे झेंडू आपल्या आरोग्यासाठीही गुणकारी आहे. आज या लेखातून आपण झेंडूच्या फुलांचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात... झेंडूची फुले चवीला तिखट, कडू आणि तुरट असतात. झेंडूची पाने मुळव्याध, मूत्रपिंडाची दुखणी आणि स्नायूंच्या दुखण्यावर गुणकारी आहेत. झेंडूच्या फुलांचा रस कानदुखीवर कानात टाकतात.

झेंडूची आरोग्यदायी फायदे -

मुळव्याधीवर उपयोगी -

झेंडूचे फुल हे मुळव्याधीवर रामबाण उपाय आहे. झेंडूच्या पाकळ्या काढून त्याचा रस काढा. त्यात 30 ग्रॅम चांगले तूप घालून दिवसातून दोन वेळ घ्या. असे केल्याने मुळव्याधीतून रक्‍त पडण्याचे थांबते. तसेच झेंडूची फुले वाटून त्यात तूप, हळद घालून गरम करा. हे मिश्रण मुळव्याधीवर बांधा. त्यामुळे मुळव्याधीचा त्रास बंद होतो.

जखमेवर लवकर भरण्यास उपयुक्त -

झेंडूची फुले वाटून त्यात तूप, हळद घालून कोमट करा. सहन होईल इतपत कोमट झाल्यावर हे मिश्रण जखमेवर बांधा. त्यामुळे जखमेची ठणक कमी होते. तसेच जखम सुकून बरी होते.

सूज आणि मुका मारावर उपयुक्त -

सूज किंवा मुक्कामार लागल्यावर झेंडूची पाने स्वच्छ धुवून वाटून ते गरम करा. हा लेप ज्याठिकाणी जखम किंवा सूज आली आहे, अशा ठिकाणी लावा. यामुळे सूज उतरण्यास मदत होते.

पोटाच्या इन्फेकशनपासून सुटका -

झेंडूच्या फुलाचा अर्क असलेले पाणी प्यायल्याने पोटाचे इन्फेकशन दूर होण्यास मदत होते. त्यात असलेल्या अँटी इन्फ्लाममेटरी गुणधर्मांमुळे पोट दुखीवर आराम मिळतो.

तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी गुणकारी -

दातांवर साचणाऱ्या बॅक्टरीयामुळे दात खराब होतात. त्यामुळे हिरड्यांचे विकार उद्भवतात. परंतु, यावर झेंडूचे फुल परिणामकारक ठरते. सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी पाण्यात Marigold Tincture चे काही थेंब घालून गुळण्या केल्यास दातांवरील प्लाग, हिरड्यांचे विकार नाहीशे होतात.

त्वचेसाठी फायदेशीर -

त्वचेसाठी झेंडूचे फुल अतिशय गुणकारी आहे. त्वचेच्या विविध समस्यांवर झेंडूच्या फुलाचा अर्क फायदेशीर ठरतो. झेंडूच्या फुलांमध्ये त्वचा सॉफ्ट करण्याचा गुणधर्म आहे. याचा हिवाळ्यात अधिक फायदा होतो. त्वचा मॉश्चराइज करण्याचा हा घरगुती उपाय आहे. (सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)