Covid-19 Could Cause Male Infertility: कोरोना विषाणूमुळे स्पर्मची निर्मिती करणाऱ्या Testicular Cells चे नुकसान झाल्याने पुरुषांमध्ये येऊ शकत वंध्यत्व; अभ्यासात करण्यात आला खुलासा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

Covid-19 Could Cause Male Infertility: कोरोना व्हायरस पुरुषांमधील वंध्यत्वाचे (Male Infertility) कारण असू शकते. इस्त्रायलमध्ये झालेल्या अभ्यासानुसार, कोविड च्या निदानानंतर 30 दिवसानंतर संक्रमित पुरुषाच्या शुक्राणूंची संख्या (Sperm Count) अर्ध्यावर आली. तेल अवीव येथील शेबा मेडिकल सेंटरचे (Sheba Medical Centre in Tel Aviv) डॉ. डॅन अ‍ॅडरका (Dr Dan Aderka) यांनीही असे म्हटले आहे की, कोरोना झालेल्या रुग्णाच्या शुक्राणूंच्या हालचालीवर परिणाम दिसून आला. परंतु, शास्त्रज्ञाच्या मते, कोविड व्यक्तीच्या प्रजननक्षमतेवर कायमस्वरुपी हानी किंवा शुक्राणूंची संख्या निर्माण करू शकतो. जेरुसलेम पोस्ट (The Jerusalem Post) ने असा दावा केला आहे की, हे संशोधन जर्नल ऑफ फर्टिलिटी अँड स्टेरिलिटीमध्ये (Journal of Fertility and Sterility) प्रकाशित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, असा दावा केला जात आहे की, कोरोना विषाणूची सौम्य लक्षणं असलेल्या पुरुषांमध्ये बदल दिसले आहेत. परंतु, या संशोधनात किती लोकांचा सहभाग होता, याविषयी माहिती नाही.

दरम्यान, या जर्नलमध्ये आज पुन्हा नमूद करण्यात आले आहे की, डॉक्टर एडार्का यांनी या अभ्यासाशी संबंधित कोणतेही पेपर सादर केल्याची नोंद नाही. कारण, अद्याप कोणत्याही जर्नलने हा अभ्यास सार्वजनिकपणे जाहीर केलेला नाही. याचा अर्थ असा आहे की, जगभरातील शास्त्रज्ञ अद्याप या पद्धतीतील स्पष्ट त्रुटी दर्शविण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रजननक्षमतेवर कोरोना विषाणूच्या परिणामाचा अभ्यास करणाऱ्या अनेक वैज्ञानिकांनी यापूर्वीही असे दावे केले आहेत. (हेही वाचा - COVID-19 Sore Throat: घसा खवखवणं सामान्य आहे की, कोरोना विषाणूच्या संसर्गाच लक्षण? जाणून घ्या अशा परिस्थितीत काय करावं)

शेफिल्ड युनिव्हर्सिटीचे अ‍ॅन्ड्रोलॉजिस्ट आणि ब्रिटीश फर्टिलिटी सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रोफेसर एलन पेसी यांनी मेलऑनलाइनला सांगितले की, कोरोना विषाणूमुळे शुक्राणूमध्ये तात्पुरती घट झाल्यास आश्चर्य वाटू नये. परंतु, गोंधळ हा आहे की, कोरोनामुळे शुक्राणू कमी होण्याचे प्रमाण दिर्घकाळ टिकू शकेल किंवा नाही. कोरोना विषाणू असलेले लोक बहुधा अस्वस्थ असतात. जरी इन्फ्लूएन्झामुळे शुक्राणूंची संख्या तात्पुरती कमी झाली. तरी ही स्थिती कायमस्वरूपी असू शकतो की, नाही सांगण कठीण आहे. कोरोना विषाणूमुळे अंडकोषांना दीर्घकाळापर्यंत नुकसान होऊ शकते किंवा नाही हे संशोधनाद्वारे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचा शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञांना अनेक वर्षे लागू शकतात.

तथापि, मागील संशोधनात असे सूचित केले गेले आहे की, कोरोना संक्रमणामुळे अंडकोषाचे कोणतेही नुकसान दीर्घकालीन नाही. प्रोफेसर पेसी यांनी नवीन इस्त्रायली संशोधनात चेतावणी दिली की कोरोना विषाणू शुक्राणू आणि टेस्टोस्टेरॉन बनवणाऱ्या अंडकोष पेशींना नुकसान पोहोचवू शकतो. डॉक्टरांनी असा दावा केला आहे की, प्राणघातक विषाणूमुळे मृत्यू झालेल्या 12 पुरुषांच्या तपासणीनंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. परंतु, प्राध्यापक पेसी यांनी सांगितले आहे की, या व्यक्ती अधिक आजारी तसेच वृद्ध होत्या. त्यामुळे त्यांच्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी दिसून आली. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सेक्स दरम्यान किस केल्याने कोरोना विषाणूचा प्रसार देखील होऊ शकतो. परंतु, शेबा मेडिकल सेंटरचे डॉ. एडार्का यांनी दावा केला आहे की, कोरोना विषाणूमुळे अंडकोष पेशी खराब होऊ शकतात. ज्यामुळे पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते.