Ghatasthapana 2020 (File Image)

भारत हा कृषिप्रधान, संस्कृती प्रधान, धर्मप्रधान देश आहे. भारतामध्ये दर महिन्यात अनेक सण-उत्सव साजरे होतात. यातील बरेच उत्सव हे शेतीशी निगडीत असतात. अशात शरद ऋतूमध्ये पावसाळा संपून शेतात नवी पिके तयार होत असतात त्यावेळी भारतामध्ये ‘शारदीय नवरात्री’चा (Shardiya Navratri 2020) उत्सव साजारा केला जातो. या दिवसांमध्ये नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते (Ghatasthapana 2020). देव्हाऱ्यात अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते. यंदा शनिवार, 17 ऑक्टोबर रोजी घटस्थापना आहे. या दिवशी घटामध्ये धान्य पेरून दिवे लावून देवीपुढे ठेवतात.

घटस्थापनेसाठी शेतातील माती, पाच प्रकारचे धान्य, घट, धान्यामध्ये साळी, गहू, इतर कडधान्ये तसेच विड्याची पाने, नाणी, सुपारी, धूप, दोरा, कुंकू, हळद, गुलाल आणि अक्षता इत्यादी गोष्टींची आवश्यकता असते. जमिनीत रोवलेले बी नऊ दिवसांत उगवते म्हणून देवीपुढे नऊ दिवस घट बसवले जातात. दहाव्या दिवशी मोठ्या थाटामाटात दसऱ्याच्या उत्सव साजरा होता. तर घटस्थापनेच्या दिवसाचे औचित्य साधून तुम्ही मराठी शुभेच्छापत्रे, SMS, Wishes, Images, WhatsApp Status, Greetings, Messages, HD Images च्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा: Navratri 2020 Simple Mehndi Design: नवरात्री उत्सवासाठी हातावर काढा 'या' सुरेख मेहंदी डिझाईन; पहा व्हिडिओ)

Ghatasthapana 2020
Ghatasthapana 2020
Ghatasthapana 2020
Ghatasthapana 2020
Ghatasthapana 2020
Ghatasthapana 2020

दरम्यान, नवरात्रीमध्ये देवी दुर्गासमोर नऊ दिवस अखंड ज्योत लावली जाते. महिषासुराचा वाढ करण्यासाठी देवीने अवतार घेतला, अशा दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री महिषासुराला ठार मारले. तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी संबोधले जाऊ लागले. यासह रामाने रावणाशी युद्ध करून दसऱ्याला त्याला ठार मारले अशीही आख्यायिका आहे. दसरा हा साडेतीन मुहूर्तातील तो एक मुहूर्त समजला जातो. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजा व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करावयाची असतात. दसरा हा सण विजयाचे प्रतीक म्हणून त्याला विजयादशमी असेही म्हणतात.