Maha Shivratri 2022: साबुदाणा खिचडीपासून ते कुट्टू चीला, उपवासाचे 5 चविष्ट पाककृती खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, पाहा व्हिडीओ

महाशिवरात्री हा एक अतिशय महत्त्वाचा आणि शुभ हिंदू सण आहे जो भगवान शिवाची भक्ती करण्यासाठी साजरा केला जातो. यावर्षी महाशिवरात्री गुरुवार दिनांक 1 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी भक्तांनी ओम नमः शिवायचा जप करतात आणि शिव मंदिरांमध्ये जागरण आयोजित करतात. अनेक भक्त कडक उपवास देखील करतात आणि भगवान शिवाची पूजा करतात. काही भक्त या दिवशी निर्जला उपवास करतात जे अन्न किंवा पाण्याशिवाय असते. परंतु बहुतेक लोक असे उपवास करतात जेथे ते दूध, फळे, काही भाज्या आणि धान्य नसलेल्या पदार्थांचे सेवन करू शकतात. तुम्ही महाशिवरात्रीचे व्रत पाळत असताना, आम्ही अलीकडेच, तोंडाला पाणी आणणाऱ्या पाककृतींची यादी तयार केली आहे. पाहा यादी

साबुदाणा खिचडी हा उपवासाच्या दिवशीचा मुख्य पदार्थ आहे जो चवदार आहे आणि तयारीला जास्त वेळ लागत नाही.

महाशिवरात्रीला उपवास करणार्‍या लोकांसाठी कुट्टू चिला हा केवळ पौष्टिक पर्याय नाही तर तो अतिशय स्वादिष्ट देखील आहे. हा पदार्थ आरोग्यदायी नाश्ता म्हणून वापरले जाऊ शकते.

उपवास म्हंटल की साबुदाणा वडा कसा विसरणार आपण बटाटे, शेंगदाणे, मसाले टाकून या शिवरात्रीला कुरकुरीत साबुदाणा वडाचा आनंद घ्या

सर्व भारतीयांना खीर नक्कीच आवडते. साबुदाण्यामध्ये चरबी किंवा कोलेस्टेरॉल नसते आणि त्यामुळे ते खूप निरोगी असतात.

चवदार तिखट तवा आलू चाट बनवण्यासाठी, तुम्हाला फक्त बटाटे आणिहिरव्या चटणीसोबत चाटचा आनंद लुटू शकता. तुम्ही आमच्या दिलेल्या रेसिपी वापरून पहा. सर्वांना महाशिवरात्री 2022 च्या हार्दिक शुभेच्छा!