Kartiki Ekadashi Fast Recipes: कार्तिकी एकादशी ला यंदा उपवासाची कचोरी, थालीपीठ ते भगर डोसा हे पदार्थ कसे बनवाल?
Fast Recipes | Photo Credits: You Tube

आषाढी एकादशी नंतर चार महिन्यांनी कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) साजरी केली जाते. भगवान विष्णू चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर निद्रा स्थितीमधून जागे होतात आणि पुन्हा नव्या, शुभ कार्यांना सुरूवात करतात. त्यामुळे हा दिवस वारकर्‍यांसोबतच विठू माऊलीच्या भक्तांसाठी महत्त्वाचा असतो. अनेक भक्तजण या दिवशी उपवास करून विठूरायाची आराधना करतात. सध्या धकाधकीच्या बनलेल्या जीवनात तुम्ही कार्तिकी एकादशीचा उपवास (Kartiki Ekadashi Fast) करणार असाल तर हे खास उपवासाचे पदार्थ नक्की बनवून पहा. Kartiki Ekadashi 2019 Date: कार्तिकी म्हणजेच देव उठनी एकादशी यंदा 8 नोव्हेंबरला; जाणून घ्या या एकादशीचं महत्त्व.

कार्तिकी एकादशी ही प्रबोधिनी एकादशी (Prabodhini Ekadashi) किंवा देवउठनी एकादशी(Dev Uthani Ekadashi) म्हणून देखील ओळखली जाते. या एकादशीलादेखील वारकरी मंडळी मोठ्य संख्येने पंढरपूरामध्ये विठ्ठल - रुक्मिणीच्या दर्शनासाठी एकत्र जमतात. विठूरायाचे उपासक यादिवशी एकादशीचा उपवास करतात. मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी असं होऊ नये यासाठी उपवासाचे हे काही हेल्दी टेस्टी पदार्थ नक्की बनवून पहा.

कार्तिकी एकादशी उपवास रेसिपीज

उपवासाचे आप्पे

भाजणीचे थालीपीठ

उपवासची कचोरी

भगर डोसा

आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करून रात्रीच्या वेळेस खास पदार्थ बनवले जातात. तर दुसर्‍या दिवशी उपवास सोडला जातो. मग जाणून घ्या यंदा नेहमीच्या साबुदाण्याची खिचडी, वडे हे पदार्थ टाळा आणि  काही हटके पदार्थ आजमावून पहा.