
करिना कपूर खान चं घरगुती जेवणावरील प्रेम सर्वशृत आहे. करिनाच्या आवडत्या घरगुती पदार्थांमध्ये राजमा चावल, आलू पराठा ते खिचडी आहे. “The Common Sense Diet” या सेलिब्रिटी आहारतज्ञ ऋजुता दिवेकर च्या पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये करिनाने आपलं 'खिचडी'प्रेम बोलून दाखवलं आहे. भारतात सगळीकडेच घराघरामध्ये 'खिचडी' बनवली जाते. अगदी घाईच्या वेळेत ते आजारपणात आणि परदेशी दौर्यांवरून आल्यानंतर अनेकजण 'खिचडी' हमखास चाखतात. करिनाने देखील आठवड्यातून 5 वेळेसही खिचडी खाऊ शकते असं म्हटलं आहे. आहारतज्ञ ऋजुताने 'घरचं खाणे हे common sense आहे आणि जेवणाबाबत साधे राहणे हे शहाणपणाचे आहे.' असं म्हटलं आहे.
पहा ऋजुताचा सल्ला
Eating ghar ka khaana is common sense and staying simple with food is smart.
Kareena at the “The common sense diet” book launch.#gharkakhaana #khichdi #kareenakapoorkhan pic.twitter.com/wHKwk7oC4y
— Rujuta Diwekar (@RujutaDiwekar) April 3, 2025
खिचडी कशी असते?
सामान्यपणे खिचडी ही केवळ तांदुळ आणि मूग डाळ एकत्र करून बनवली जाते. आवडी नुसार, चवी नुसार त्यामध्ये मसाला किंवा मिरची तसेच भाज्या मिसळून खिचडी बनवली जाते. अनेकांना त्यावर तूप मिसळून खाणं पसंत आहे. आयुर्वेदानेही खिचडी खाणं आरोग्यदायी म्हटलं आहे. शरीरात वात, पित्त आणि कफ हे तिन्ही दोष संतुलित ठेवण्याची क्षमता खिचडी मध्ये असल्याचं म्हटलं आहे.
खिचडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे
खिचडी पोटासाठी सौम्य आहे. तांदूळ आणि डाळीच्या मिश्रणामुळे प्रीबायोटिक्स मिळतात, जे आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांना आधार देतात. आयुर्वेदानुसार, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करण्यासाठी पंचकर्म सारख्या शुद्धीकरण उपचारांमध्ये खिचडी दिली जाते.
आहारतज्ञांच्या मते, तांदूळ आणि मूग डाळ यांचे मिश्रण एक संपूर्ण प्रथिन स्रोत तयार करते, जे शरीराला सर्व आवश्यक अमीनो अॅसिड्स देतात. यामुळे खिचडी एक पौष्टिक जेवण बनते जे शरीरात टिश्यूंचे पोषण करतात आणि चांगले आरोग्य देतात.
खिचडीत कॅलरीज आणि फॅट कमी असतात, ज्यामुळे ते हलके जेवण बनते आणि वजन कमी करण्यास मदत करते. पोटभारीचंजेवण असल्याने अनावश्यक खाणं टाळलं जातं.त्यामध्ये हळद आणि जिरे सारख्या मसाल्यांचा वापर पचनक्रिया सुधार्ण्यास मदत करते.