एक सच्चा खवय्या नेहमीच कुठे काही चांगलं चुंगलं खायला मिळतंय का याच्याच शोधात असतो. नवनवीन ठिकाणं धुंडाळतो. नवनवीन पदार्थ चाखतो. काही आवडतात. मग तो ते घरीही करून बघतो. अशाच काही खवय्यांसाठी हल्ली बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे फ्युजन पाहायला मिळतात. मग ते चॉकलेट सँडविच असो, चॉकलेट ब्राउनी विथ वॅनिला आईस्क्रिम असो, किंवा अगदी पुरणपोळी आईस्क्रिम असो. पण गेल्या काही वर्षांमध्ये हे असे अनेक प्रकार उदयाला आहेत.
आता या गोष्टींमध्ये अजून एका पदार्थाची भर पडली आहे. तुम्ही पिझ्झा खाल्ला असेलच. बऱ्याचदा मित्रमंडळी जमली की पिझ्झाची ऑर्डर तर हमखास असतेच. आणि गुलाबजाम? सणावारी तर बऱ्याचदा केला जाणारा हा प्रकार. पण तुम्ही विचार केलाय का कधी या दोन गोष्टींना एकत्र करूनही काही पदार्थ बनवता येईल? हो सध्या एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे, ते म्हणजे 'गुलाबजाम पिझ्झा'. (हेही वाचा. World Food Day 2019: मुंबई, पुणे शहरात 'या' NGO ला उरलेलं अन्न फेकण्याऐवजी दान करून भूक भागवण्याचं पुण्य मिळवा!)
Uff what is wrong with this world
well this is, to start with
GULAB JAMUN PIZZA in Pakistan
from a food group on FB pic.twitter.com/G3RuBfwSq5
— Burhan Muzaffar (@burhanmz) November 8, 2019
पिझ्झा बेसवर असलेले मस्त मोठाले गुलाबजाम आणि त्यावर टाकलेल्या बदामाच्या पाकळया असा हा फोटो सध्या खूप व्हायरल झाला आहे. काहींना ही अभिनव कल्पना प्रचंड आवडली आहे. तर दुसरीकडे काही जणांनी तर या फोटोचं ट्रोलिंगही सुरु केलंय. अनेक जणांनी याची थट्टाही उडवली आहे. मग तुम्हाला कसा वाटतोय हा नवीन पदार्थ ? करून बघा आणि आम्हालाही कळवा कसा लागतोय.