Google Doodle Bubble Tea | (Photo Credits: Google)

गूगल डूडल (Google Doodle) हा अनेकदा उत्सुकतेचा विषय ठरतो. गूगल आपल्या होम पेजवर एक प्रितिमा अथवा चित्रफीत कधी ध्वनीचित्रफीत दाखवते त्याला डूडल म्हणतात. डूडल नेहमीच लक्षवेधी असते. आजही गूगलडने हटके डूडल बनवले आहे. ज्यात एका सूंदर अशा अॅनिमेशनद्वारे, Google जगभरात बबल चहा लोकप्रियता साजरी करत आहे. बबस चहा एक असे पेय राहिले आहे. ज्याची पाठीमागील अनेक वर्षांपासून जनमानसावर छाप उमटली आहे. दरम्यान, कोविड महामारीच्या काळात तर चहाने असंख्य चाहते निर्माण केले. त्यावरच आजचे गूगड डूडल आधारी आहे. आपण पाहिले का? आणि हो गूगलने डूडलच्या माध्यमातून एक खास खेळही ऑफरकेला आहे. घ्या जाणून..

तुम्हीही बनवा स्वत:चा ‘डिजिटल बबल टी’

डूडल केवळ बबल चहाचा उत्सवच नाही, तर Google आज त्याच्या संवादात्मक डूडलद्वारे तुम्हाला तुमचा स्वतःचा ‘डिजिटल बबल टी’ बनवू देईल. तुम्हाला फक्त Google Doodle वर क्लिक करायचे आहे आणि तुमच्या स्क्रीनवर अॅनिमेशन प्ले होण्यास सुरुवात होईल. (हेही वाचा, India's 74th Republic Day Google Doodle: भारतीय प्रजासत्ताक दिन 2023 गूगल डूडल तुम्ही पाहिले का? इंडिया गेट, परेड आणि बरंच काही पाहून व्हाल थक्क)

डूडलने म्हटले आहे की, दुधाळ आणि तिखट पेयाच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण देताना, Google ने आपल्या डूडल पेजवर लिहिले की, “हे तैवानी पेय आता स्थानिक पदार्थ म्हणून सुरू झाले आणि गेल्या काही दशकांमध्ये त्याची लोकप्रियता वाढली आहे. बबल चहाची मुळे पारंपारिक तैवानच्या चहा संस्कृतीत आहेत जी 17 व्या शतकापासून सुरू झाली आहे.