Dry Days in India 2021: नववर्षाचे प्लानिंग करताय? मद्य प्रेमींनो लक्षात ठेवा हे 'ड्राय डे';  Bars, Pubs,  Liquor Shops येथे मिळणार नाही थेंबभरही दारु
Dry Days | Representational Image (Photo Credits: Pixabay)

तुम्ही जर 2021 या नववर्षाचे प्लानिंग सुरु केले आहे आणि तुम्ही जर मद्यप्रेमी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 2021 या नव वर्षांमध्ये जवळपास प्रत्येक महिन्यात 'ड्राय डे' येत आहेत. आपल्याला माहिती आहेच मद्यविक्रीबाबतच्या कायद्यानुसार (Alcohol Laws in India) 'ड्राय डे' असेल तर त्या संपूर्ण दिवसभरात कोठेही मद्य मिळत नाही. मग ते ठिकाण बिअर बार, पब्ज, देशी दारुचे दुकान असो अथवा इतर कोणतेही. तुम्हाला मद्य काही मिळणार नाही. त्यामुळे याला पर्याय एकच एक तर त्या दिवशी मद्य सेवन न करणे किंवा त्या दिवसासाठी आवश्यक मद्याची तजवीज आगोदरच करुन ठेवणे. जाणून घ्या या वर्षात कोणत्या महिन्यात कोणकोणत्या दिवशी आहेत 'ड्राय डे'.

जानेवारी 2021

जानेवारी महिन्यात 14 आणि 26 आणि 30 जानेवारी या दिवशी ड्राय डे आहे. 14 तारखेला मखर संक्राती तर 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन तर 30 जानेवारीला शहीद दिन (Martyr’s Day) आहे.

फेब्रुवारी 2021

फेब्रुवारी महिन्यात 19 तारखेला महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti ) आणि 27 फेब्रुवारीला गुरु रोहिदास जयंती (Guru Ravidass Jayanti ) निमित्त दिल्ली येथे ड्राय डे आहे.

मार्च 2021

मार्च महिन्यात 8 मार्चला स्वामी दयानंद सर्वस्वती जयंती, 11 मार्चला महाशिवरात्री, 29 मार्च या दिवशी होळी येत असल्याने ड्राय डे आहेत

एप्रिल 2021

एप्रिल महिन्यात 2 तारखेला गुड फ्रायडे, 14 एप्रिलला आंबेडकर जयंती, 21 तारखेला राम नवमी, 25 तारखेला महावीर जयंती या दिवशी ड्राय डे.

मे 2021

एक मे या दिवशी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन असतो. या दिवसासोबतच 12 मे या दिवशी ईद उल-फितरला सुरुवात आणि 13 मे या दिवशी गुरुवार ईद उल-फितर संपत आहे. त्यामुळे या दिवशी आणि 14 मे या दिवशी बासावा जयंती (कर्नाटकात) असल्याने ड्राय डे आहेत.

जून 2021

जून हा एकमेव महिना आहे. या महिन्यात एकही ड्राय डे नाही.

जुलै 2021

जुलै महिन्यात 20 तारखेला महाराष्ट्रात आषाढी एकादशी / शायनी एकादशी असते. तसेच 24 जुलै या दिवशी गुरु पूर्णिमा दिल्ली, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरी होते. त्यामुळे या महिन्यात दोन वेळा ड्राय डे आहेत.

ऑगस्ट 2021

ऑगस्ट महिन्यात 10 ऑगस्टला महर्रम, 15 ऑगस्टला स्वातंत्र्या दिन आणि 30 ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी असल्याने ड्राय डे आहेत.

सप्टेंबर 2021

सप्टेंबर महिन्यात 10 तारखेला गणेश चतुर्थी आणि 19 तारखेला अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे या महिन्याद दोन दिवस ड्राय डे आहेत. (हेही वाचा, Lucky Foods for 2021: नवीन वर्षात Good Luck मिळवण्यासाठी करा 'या' पदार्थांचे सेवन; कारण 2020 नंतर आपल्या सगळ्यांनाच आहे याची गरज)

ऑक्टोबर 2021

2 ऑक्टोबर- गांधी जयंती

6 ऑक्टोबर- महालय अमावस्या (Mahalaya Amavasya)

8 ऑक्टोबर- Prohibition Week (in Maharashtra)

15 ऑक्टोबर- दशहरा / विजयादशमी

18 ऑक्टोबर- ईद-ए-मिलाद (Eid-e-Milad)

20 ऑक्टोबर- महर्षि वाल्मीकि जयंती (Maharishi Valmiki Jayanti)

नोव्हेंबर 2021

नोव्हेंबर महिन्यात 1 तारखेला कर्नाटक राज्योत्सव असल्याने कर्नाटकात ड्राय डे आहे. 4 नोव्हेंबरला दिवळी, 14 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी / प्रबोधिनी एकादशी,

19 फेब्रुवारीला गुरु नानक जयंती, 22 नोव्हेंबरला कनकदास जयंती (कर्नाटकात), 24 नवेंबरला गुरु तेग बहादूर यांचा शहादत दिवस असल्याने ड्राय डे आहे.

डिसेंबर 2021

डिसेंबर महिना जून प्रमाणेच एकमेवर आहे. या महिन्यातही कोणत्याही प्रकारे ड्राय डे नाही.

दरम्यान, 2021 या संपूर्ण वर्षात जवळपास 35 दिवस ड्राय डे आहेत. यात महाराष्ट्र, कर्नाटक आणि राजधानी दिल्लीचा समावेश आहे. दरम्यान, विविध राज्यांत जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा निवडणूक आयोग आदर्श आचरसंहिता लागू करतो. तेव्हाही ड्राय डे असतात. ते तत्कालीन असतात.