Britannia, Wibs, Modern Bread Price Hike: तुम्हाला जर वडापाव, पावभाजी, सँडविच किंव तत्सम पावासोबत मिळणारे पदार्थ खाणे आवडत असेल. तर, जरा खिसा आणखी सैल सौडण्याची तयारी ठेवा. कारण देशभरात मैदा भलताच महाग झाला आहे. परिणामी पावाच्या किमतीही वाढल्या आहेत. सहाजिकच पावाचा वापर केल्या जाणाऱ्या पदार्थांच्या किमतीतही वाढ झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे 8 सप्टेंबरपासून ब्रिटानिया, विब्स आणि मॉडर्न बेकरी यांसारख्या प्रमुख उत्पादकांनी त्याची किंमत वाढवली आहे.
आमच्याशी संलग्नीत इंग्रीजी भाषेतील वेबसाईट लेटेस्टलीने TOI हावाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, स्लाईस व्हाईट ब्रेडची (White Bread) किंमत मुंबईत 2 रुपयांवरून 8 रुपयांवर पोहोचली आहे. रिफाइंड फ्लोअर (Refined Flour) म्हणजेच मैद्याच्या वाढत्या किमतीमुळे पाव महागला आहे. 8 सप्टेंबरपासून, ब्रिटानिया, विब्स आणि मॉडर्नसह प्रमुख उत्पादकांनी त्यांच्या ब्रेडची किंमत वाढवली आहे प्रति, 350-400 ग्रॅम वजनाच्या स्टँडर्ड व्हाईट ब्रेडची किंमत 35 रुपयांवरून 38 रुपयांपर्यंत वाढली आहे. 200 ग्रॅमच्या छोट्या ब्रेडची किंमत 18 रुपयांवरून 20 रुपयांपर्यंत वाढली आहे.
दरम्यान, curlytales डॉट कॉमने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, 350-400 ग्रॅम वजनाच्या मानक प्राप्त पांढऱ्या ब्रेडची किंमत ₹35 वरून ₹38 पर्यंत वाढली आहे. याच पावातील छोट्या 200 ग्रॅम लादीची किंमत 18 वरून 20 रुपये झाली आहे.
दरम्यान पांढऱ्या ब्रेडमध्येही दोन प्रकार असतात, त्यातील 600-650 ग्रॅम वजनाच्या लादीची किंमत पूर्वी किंमत ₹52-55 दरम्यान होती. जी सध्या जवळपास 60 रुपयांवर पोहोचली आहे. विब्स व्हाईट ब्रेडची 800 ग्रॅम वजनाची लादी किंमत आता ₹70 ऐवजी ₹75 पर्यंत पोहोचली आहे. खास करुन या पावाचा वाप हा सँडविच विक्रेते करतात.