Kartiki Ekadashi Messages 2022: कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. यंदा, कार्तिक एकादशी 4 नोव्हेंबरला आहे. कार्तिक शुद्ध एकादशीलाचं प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णु त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागे होतात व पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्विकारतात अशी मान्यता आहे. माउली भक्तांना आषाढी एकादशीप्रमाणे कार्तिकी एकादशीही खूप महत्वाची असते. दरम्यान या शुभ प्रसंगी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, कार्तिकी एकादशी निमित्त HD Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून विठूरायाच्या भक्तांना खास मराठमोळ्या शुभेच्छा नक्की द्या.
पाहा खास शुभेच्छा संदेश
कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करतात. कार्तिक एकादशीपासून तुलसी विवाहास सुरुवात होते. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची होऊन लग्नसराईचे दिवस सुरु होतात.