Gauri Pujan 2023 Muhurat: यंदा कधी होणार गौरीचं आगमन? जाणून घ्या गौरी पूजनाचा मुहूर्त आणि पूजा विधी
Gauri Pujan 2023 (PC - File Image)

Gauri Pujan 2023 Muhurat: महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2023) उत्सवादरम्यान ज्येष्ठा गौरी पूजन केले जाते. यंदा 21 सप्टेंबर रोजी गौरी आव्हान तर 22 सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि 23 सप्टेंबर 2023 रोजी गौरी विसर्जन करण्यात येणार आहे. भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केलं जातं. पहिल्या दिवशी आवाहन केलं जातं. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर मुख्य गौरी पूजन केलं जातं. काही लोक या दिवशी सत्यनारायणची पूजा देखील करतात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करण्यात येतं.

गौरी पूजनाच्या वेळी ज्येष्ठ आणि कनिष्ठ या दोन प्रकारच्या गौरींची पूजा केली जाते. ज्येष्ठ आणि कनिष्ठ या अनुक्रमे श्री गणेशाच्या तारक (तारक) आणि संहारक (मारक) शक्ती होत्या असे मानले जात होते. गौरी हा गणेशाची आई पार्वतीचा अवतार आहे. मात्र, महाराष्ट्रात गौरी ही गणेशाची बहीण असल्याचे मानले जाते. गौरीच्या आगमनाने घरामध्ये आगमन आरोग्य, संपत्ती, आनंद आणि समृद्धी नांदते. (हेही वाचा - Ganpati Visarjan 2023 Date: 1.5, 3, 5, 7 दिवसाच्या 'गणपती विर्सजना'च्या तारखा, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या)

ज्येष्ठा गौरी पूजा शुभ मुहूर्त 2023

  • 21 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठागौरी आवाहन सकाळी 06:12 वाजेपासून ते दुपारी 03.34 पर्यंत
  • 22 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठागौरी पूजन
  • 23 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठागौरी विसर्जन सकाळी 06:27 वाजेपासून ते दुपारी 02.55 पर्यंत

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला श्री महालक्ष्मी गौरीने असुरांचा वध करून आश्रयासाठी आलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील जीवांना सुखी केले. त्यामुळे अखंड वैवाहिक सुख प्राप्तीसाठी महिला ज्येष्ठा गौरीचे व्रत करतात. हे व्रत तीन दिवस चालते.

प्रदेशानुसार हे व्रत पाळण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये धातूची किंवा मातीची मूर्ती बनवून त्याची गौरी रूपात पूजा केली जाते. महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पाच लहान मातीची भांडी एकावर एक ठेवली जातात आणि त्यावर मातीचा गौरीचा मुखवटा ठेवला जातो.