Raksha Bandhan 2025 Date (फोटो सौजन्य - File Image)

Raksha Bandhan 2025 Date: सनातन धर्मात रक्षाबंधनाच्या सणाला विशेष महत्त्व आहे. हा सण भावंडांमधील नाते प्रेम, काळजी यांना समर्पित आहे. यंदा रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan 2025) सण शनिवार, 9 ऑगस्ट 2025 रोजी देशभर साजरा केला जाईल. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात. तसेच भाऊ आपल्या बहिणींचे रक्षण करण्याची आणि त्या बदल्यात त्यांना भेटवस्तू देण्याची प्रतिज्ञा करतात. रक्षाबंधनाचा सण वर्षानुवर्षे साजरा होत आला आहे.

रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त -

या वर्षी रक्षाबंधन शनिवारी, 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. या दिवशी राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 05:47 ते दुपारी 01:24 पर्यंत आहे. या दिवशी राखी बांधण्यासाठी एकूण 7 तास 37 मिनिटांचा कालावधी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, राखी विधींसाठी अशुभ मानला जाणारा भद्रा काल या दिवशी सूर्योदयापूर्वी संपेल, त्यामुळे सकाळी हा विधी करणे सुरक्षित ठरेल. (हेही वाचा - Shravan 2025 1st Somvar Date: श्रावण 2025 महिन्यातील पहिला सोमवार कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व)

तथापी, पौर्णिमा तिथी, 8 ऑगस्ट रोजी दुपारी 02:12 वाजता सुरू होईल आणि 9 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 01:24 वाजता संपेल. अशाप्रकारे, भाऊ-बहिणींमधील प्रेम आणि संरक्षणाचा हा सुंदर सण साजरा करण्यासाठी शनिवारची सकाळ ही योग्य वेळ आहे. (हेही वाचा - Festival In July 2025: जुलै महिन्यात कोण-कोणते सण आणि उत्सव साजरे होणार? जाणून घ्या संपूर्ण यादी)

रक्षाबंधन हा केवळ एक विधी नसून प्रेम, विश्वास आणि एकतेचा उत्सव आहे. तो सर्वांना कुटुंबाचे महत्त्व आणि भाऊ-बहिणीच्या बंधनाची ताकद याची आठवण करून देतो. हा सण संपूर्ण भारतातील कुटुंबे आणि समुदायांमध्ये आनंद, एकता आणि आपलेपणाची भावना आणतो.