When is Shravan 2025 1st Somwar (फोटो सौजन्य - Pixabay, Edited Image)

Shravan 2025 1st Somvar Date: श्रावण महिन्या (Shravan 2025) सुरु होण्यास काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. श्रावण महिना भगवान शिवाच्या भक्तीसाठी खूप खास मानला जातो. या महिन्यात भक्त वेगवेगळ्या प्रकारे शिवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. श्रावण महिन्यात येणारा सोमवार खूप शुभ मानला जातो कारण श्रावण हा शिवाचा आवडता महिना आहे. तसेच सोमवार हा शिवाचा आवडता दिवस आहे. यंदा तुम्ही देखील श्रावण सोमवारचे व्रत करणार असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूपचं महत्त्वाचा आहे. यावर्षी श्रावण महिना कधी (Shravan 2025 Date) सुरू होईल? आणि श्रावण महिन्यातील पहिला सोमवार कधी आहे (Shravan 2025 1st Somwar Date)? ते जाणून घेऊयात.

श्रावण महिना 2025 कधी पासून सुरू होणार आहे?

यंदा श्रावण महिना शुक्रवार, 11 जुलैपासून सुरू होईल, जो 9 ऑगस्टपर्यंत चालेल. ज्योतिषांच्या मते, यावेळी श्रावण पूर्ण 30 दिवसांचा असेल. 2025 सालच्या श्रावणमध्ये 4 सोमवार येण्याचा योगायोग असेल. हे सर्व सोमवार शिवपूजेसाठी खूप शुभ असतील. (हेही वाचा - Festival In July 2025: जुलै महिन्यात कोण-कोणते सण आणि उत्सव साजरे होणार? जाणून घ्या संपूर्ण यादी)

श्रावण 2025 महिन्यातील पहिला सोमवार कधी आहे?

पंचांगानुसार, श्रावण 2025 चा पहिला सोमवार 14 जुलै रोजी आहे. या दिवशी संकष्टी चतुर्थीचे व्रत देखील केले जाईल, म्हणजेच या दिवशी भगवान शिव यांच्यासोबत त्यांचा पुत्र श्री गणेशाचीही पूजा केली जाईल. 14 जुलै रोजी दिवसभर आयुष्मान, सौभाग्य, शुभ आणि अमृत हे 4 शुभ योग राहतील, ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढेल.

श्रावण सोमवारी भगवान शिवाची पूजा कशी करावी?

श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर उपवास आणि पूजा करण्याची प्रतिज्ञा करावी. शुभ मुहूर्तात, घरातील स्वच्छ ठिकाणी एका पाटावर शिवलिंग स्थापित करा. सर्वप्रथम, शिवलिंगाला स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. यानंतर, गाईच्या दुधाने अभिषेक करा आणि पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करा. आता शिवलिंगावर एक-एक करून फुले, धतूरा, अंकडा, भांग इत्यादी अर्पण करा. तुमच्या इच्छेनुसार फळे आणि मिठाई अर्पण केल्यानंतर, ओम नमः शिवाय मंत्राच्या किमान 5 माळा जप करा. त्यानंतर, भगवान शिवाची आरती देखील करा. अशा प्रकारे श्रावण सोमवारी भगवान शिवाची पूजा केल्याने, महादेव खूप प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात.

(Disclaimer - या लेखातील माहिती धार्मिक ग्रंथ, विद्वान आणि ज्योतिषी यांनी सांगितलेली असून आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे फक्त एक माध्यम आहोत. वापरकर्त्यांनी ही माहिती केवळ माहिती म्हणून विचारात घ्यावी. लेटेस्टली मराठी वरील गोष्टीची हमी देत नाही.)