Sawan 2025 Festivals Full Calendar (फोटो सौजन्य - File Image)

Festival In July 2025: जुलै महिना सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. हिंदू धर्मात जुलै महिन्यातील सण आणि उत्सवांना (Festival In July 2025) खूप धार्मिक महत्त्व आहे. कारण, या महिन्यात श्रावण देखील सुरू होत आहे, जो एक अतिशय पवित्र महिना मानला जातो. भगवान शिवांना समर्पित श्रावण सोमवार उपवासांपासून ते हरियाली तीज उत्सवांपर्यंत, या महिन्याचे आध्यात्मिक महत्त्व खूप आहे. जुलै महिन्यात कोणते सण आणि उत्सव असतात ते जाणून घेऊयात.

जुलै महिन्यात साजरे करण्यात येणारे सण -

  • 3 जुलै- या दिवशी मासिक दुर्गाष्टमी साजरी केली जाईल, जी गुप्त नवरात्राच्या दृष्टिकोनातून खूप खास आहे कारण हा दिवस तंत्र विद्या इत्यादींसाठी शुभ मानला जातो.
  • 6 जुलै- देवशयनी एकादशी आणि गौरी व्रत. तसेच, या दिवसापासून चातुर्मास देखील सुरू होत आहे. चातुर्मासात कोणतेही शुभ कार्य केले जाणार नाही.
  • 7 जुलै- देवशयनी एकादशी हा व्रतासाठी पारणाचा दिवस आहे. या दिवशी वासुदेव द्वादशी देखील साजरी केली जात आहे.
  • 8 जुलै- भौम प्रदोष व्रत. या दिवशी संध्याकाळी भगवान शिवाची पूजा करण्याची प्रथा आहे.
  • 9 जुलै- आषाढ महिन्यातील चौमासी चौदस
  • 10 जुलै- या दिवशी कोकिळा व्रत, आषाढ पौर्णिमा (गुरु पौर्णिमा) उत्सव साजरा केला जातो.
  • 11 जुलै- या दिवशी पवित्र श्रावण महिना सुरू होत आहे.
  • 14 जुलै- गजानन संकष्टी चतुर्थी या दिवशी साजरी केली जाते.
  • 15 जुलै- मंगळा गौरा व्रत
  • 16 जुलै - कार्का संक्रांती.
  • 17 जुलै- कालाष्टमी आणि मासिक कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल.
  • 20 जुलै- मासिक कार्तिगाई.
  • 21 जुलै- कामिका एकादशी आणि रोहिणी व्रत.
  • 22 जुलै- कामिका एकादशी व्रत पाळण्यात येणार आहे. तसेच या दिवशी भौम प्रदोष व्रत पाळले जाते.
  • 23 जुलै- मासिक शिवरात्री या दिवशी कावड यात्रेसाठी जल अर्पण करण्यात येईल.
  • 24 जुलै- हरियाली अमावस्या.
  • 27 जुलै- हरियाली तीज. विवाहित महिला सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात.
  • 28 जुलै- विनायक चतुर्थी.
  • 29 जुलै- नागपंचमी.
  • 30 जुलै - कल्की जयंती आणि स्कंद षष्ठी साजरी करण्यात येईल.
  • 31 जुलै रोजी तुलसीदास जयंती आहे.

अशा प्रकारे जुलै महिन्या एक प्रकारे भक्तीचा संगम असून या काळात अनेक महत्त्वाचे सण साजरी होणार आहेत. त्यामुळे तुम्ही देखील हे सण आणि उत्सव साजरे करणार असला तर तुम्ही वरील लिस्ट पाहून त्याची पूर्व तयारी करू शकता.