
मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्ष पंचमी तिथीला विवाह पंचमी साजरी केली जाते. या तिथीला श्री राम आणि माता सीता यांचा विवाह झाला होता. तसेच या दिवसाला श्रीराम पंचमी असे सुद्धा म्हटले जाते. यंदा विवाह पंचमी 1 डिसेंबरला साजरी करण्यात येणार आहे. या दिवसाला धार्मिक महत्व आहेच पण लग्न केले जात नाही. याच्या पाठी एक पौराणिक कथा आहे. धार्मिक दृष्ट्या महत्वपूर्ण असणाऱ्या या दिवशी भगवान रामाला 14 वर्षांसाठी वनवासासाठी जावे लागले होते. राम आणि सीतेचे आयुष्य हे कष्टपूर्ण परिस्थितीतून गेल्यामुळेच विवाह दृष्टीने हा दिवस उत्तम मानला जात नाही.
भगवान काम आणि सीता यांचा विवाह 1 डिसेंबरला झाल्याने काही ठिकाणी लग्न केले जात नाही. विवाह न करण्यामागील मान्यता म्हणजे सीतेला लग्नानंतर पतीपासून दूरावा सहन करावा लागला होता. रामाला महाल सोडून वनवासात पाठवण्यात आले त्याच वेळी तिचे हरण झाले. सीतेला पुन्हा परत मिळवण्यासाठी रामाने रावणासोबत युद्ध केले होते. त्यानंतर पुन्हा राम महालात परतल्यानंतर सुद्धा सीतेला त्याग करावा लागला होता. याच कारणामुळे बहुतांश लोक आपल्या मुलींचे लग्न या दिवशी करत नाहीत.(Margashirsha Guruvar Vrat 2019 Dates: यंदा मार्गशीर्ष गुरूवार व्रत कोणत्या 4 दिवशी केले जाणार?)
विवाह पंचमी दिवशी भगवान राम आणि सीता यांच्या विवाहाच्या पाठाचे वाचन केले जाते. तसेच रामभक्त विवाह पंचमी महोत्सव आपल्या आनंदानुसार साजरा करतात. या दिवशी ठेवलेले व्रत खुप लाभदायक असल्याची मान्यता समाजात आहे. असे ही मानले जाते सीतेचे पिता राजा जनक यांनी असा निर्णय घेतला होता की जो कोणी शिवाच्या धनुष्याने त्याला उचलू शकेल त्याच्यासोबत सीतेचा विवाह केला जाणार असा निर्णय घेण्यात आला होता.