
Veer Savarkar Jayanti 2023: वीर सावरकर यांची जयंती २८ मे रोजी साजरी केली जाते. राहुल गांधींच्या विधानानंतर देशात अनेक ठिकाणी विरोध केला जात होता. दरम्यान, राज्यात शिंदे गट आणि भाजपाच्या वतीने सर्व जिल्ह्यांतून ‘सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात आली होती. वीर सावरकर यांची जयंती ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्यात यावी अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी केली होती. त्यानुसार ११ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे,अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. दरम्यान, वीर सावरकर यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यंदा उत्साहात सावरकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त Images, Wishes, Whatsapp Status शेअर करून स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमज डाऊनलोड करू शकता.
पाहा, खास संदेश







भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या वतीने राज्यात अनेक ठिकाणी ‘वीरभूमी परिक्रमा’अंतर्गत ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’चे आयोजन दि. २१ ते २८ मे दरम्यान करण्यात आले आहे.