Veer Savarkar Jayanti | File Photo

क्रांतिकारक, भाषाशुद्धी, लिपीशुद्धी चळवळीचे समर्थक ते विज्ञानाचा पुरस्कार करत त्यांनी जातीभेदालाही प्रखर विरोध करणारे महाराष्ट्राच्या मातीतील स्वातंत्र्य सेनानी वीर सावरकर (Veer Savarkar) यांची आज जयंती आहे. ही सावरकरांची 138 वी जयंती आहे. या दिवसाचं औचित्य साधत वीर सावरकरांच्या विचारांना शेअर करत त्यांच्याप्रती आदरांजली अर्पण करण्यासाठी खास मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्रं, Messages, HD Images शेअर करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढच्या पिढीला नक्की द्यायला विसरू नका.

वीर सावरकर यांनी मातृभूमीच्या प्रेमापोटी त्यांनी आपलं जीवन अर्पण केलं. ब्रिटिश सत्तेसमोर लाचारी न पत्करता त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा देखील भोगली. 1 फेब्रुवारी 1966 अन्न पाणी औषधे सोडून देत त्यांनी आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.आणि 26 दिवसांनी अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. पण आजही त्यांच्या तेजस्वी विचारांची ऊब कायम आहे.

वीर सावरकर जयंती

Veer Savarkar Jayanti | File Photo
Veer Savarkar Jayanti | File Photo
Veer Savarkar Quotes | File Image
Veer Savarkar Quotes | File Image
Veer Savarkar Quotes | File Image

विनायक दामोदर सावरकर यांना दिलेल्या 'वीर' या उपादीवरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. यामध्ये राजकीय भेदाभेद आहेत. परंतू सावरकरांच्या अनुयायींसाठी हा दिवस खास असल्याने त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विविध स्पर्धांच्या माध्यमातून तरूणांपर्यंत त्यांचे हे विचार पोहचवण्याचा प्रयत्न केला जातो.