Vat Savitri 2020 Wishes & Images: वट सावित्री निमित्त सौभाग्यवतींना WhatsApp Stickers, Facebook Messages, GIF, Greetings, Quotes, Photos आणि HD Images च्या माध्यमातून द्या शुभेच्छा!
वट सावित्रीच्या शुभेच्छा (Photo Credits-File Image)

Vat Savitri 2020 Wishes: हिंदू धर्मात विवाहित स्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी वर्षभरात विविध व्रत आणि उपवास करतात. मात्र जेष्ठ महिन्यातील अमावस्येला येणाऱ्या वट सावित्रीचे व्रत सर्वाधिक महत्वाचे असते. या दिवशी सौभाग्यवती महिला त्यांच्या पतीसाठी दीर्घायुष्य लाभागे आणि वैवाहिक जीवन सुखात जावे यासाठी प्रार्थना करत व्रत ठेवतात. तसेच या दिवशी विवाहित महिला वटवृक्षाची पुजा करतात. वट सावित्री व्रत कथेनुसार सावित्री हिने आपला पती सत्यवान याचे प्राण यमराजाकडून परत आणले होते. तसेच तिने वटवृक्षाच्या खालीच त्याला पुन्हा जीवनदान दिले होते. यंदाच्या वर्षी वट सावित्रीचे व्रत येत्या 22 मे 202 रोजी साजरे करण्यात येणार आहे. भारतातील बहुतांश ठिकाणी वटपौर्णिमा साजरी केली जाते. मात्र बिहार, उत्तर प्रदेशात या सणाचे एक वेगळेच रुप पहायला मिळते.

वट सावित्रीचे व्रत महिला अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक आयुष्य मिळवण्यासाठी करतात. तर या खास सणानिमित्त तुमच्या सौभाग्यवती मैत्रीणींना आणि नातेवाईकांना मनमोहक WhatsApp Stickers, Facebook Messages, GID, Greetings, Quotes, Photos आणि HD Images च्या माध्यमातून द्या शुभेच्छा!(Vat Savitri HD Images & Wishes for Free Download Online: सुवासिनींसाठी खास वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे WhatsApp Stickers आणि GIFs!)

हॅप्पी वट सावित्री (Photo Credits-File Image)
हॅप्पी वट सावित्री (Photo Credits-File Image)
हॅप्पी वट सावित्री (Photo Credits-File Image)
हॅप्पी वट सावित्री (Photo Credits-File Image)
हॅप्पी वट सावित्री (Photo Credits-File Image)

Vat Savitri Vrat: वट सवित्रिची पूजा का करतात आणि केव्हापासून झाली याची सुरुवात - Watch Video

हिंदू धर्मात प्रचलित मान्यतांनुसार, वटवृक्षात त्रिदेव ब्रम्हा, विष्णु आणि महेश यांचा वास असल्याचे मानले जाते. असे म्हटले जाते की, वट सावित्रीचे व्रत केल्याने पतीचा अकाली मृत्यू टळला जात असून वडाच्या झाडाची पुजा केल्यास प्रत्येक इच्छा पुर्ण होतात. वटवृक्षाची पुजा केल्यास महिलांना अखंड सौभाग्य, सुख-समृद्धि आणि सुखी वैवाहिक जीवनाचे वरदान मिळते.