कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशीला 'उत्पत्ती एकादशी' (Utpanna Ekadashi) म्हणून देखील ओळखलं जातं. आज (30 नोव्हेंबर) दिवशी हिंदू धर्मीय उत्पत्ती एकादशी साजरी करत आहेत. पुराण कथांनुसार, कार्तिकी एकादशीनंतर साजरी केल्या जाणार्या उत्पत्ती एकादशीला देवी एकादशी प्रकट झाल्याने त्याचं विशेष महत्त्व आहे. उत्पती एकादशी ही उत्पन्ना एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. त्यामुळे हिंदू धर्मीयांमध्ये या एकादशीचं व्रत पाळणार्यांना आज सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा, संदेश, ग्रीटींग्स पाठवून आजच्या उत्पत्ती एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा शेअर करू शकता. त्यासाठी लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली ही शुभेच्छापत्र तुम्ही नक्कीच डाऊनलोड करून शेअर करू शकता.
'एकादशी' ही एक देवी असून तिचा जन्म भगवान विष्णूमुळे झाला होता. ही एकादशी कार्तिक कृष्ण एकादशी या दिवशी प्रकट झाली होती. त्यामुळे तिचे नाव 'उत्पत्ति एकादशी' असे पडले. या दिवसापासून एकादशीचे व्रत ठेवण्याची सुरूवात केली जाते.
उत्पत्ती एकादशीच्या शुभेच्छा
उत्पत्ती एकादशी पासून भाविक इच्छा प्राप्ती व्हावी,मोक्ष मिळावा म्हणून एकादशीच्या व्रताला सुरवात करू शकातात, कारण या एकादशी पासून वर्षभराच्या एकादशी व्रताला सुरूवात होत असल्याचे मानण्यात येते. वर्षभरात सामान्यपणे 24 एकादशी येतात. प्रत्येक महिन्याच्या एकादशीला जो कोणी उपास करेल त्याच्या सर्व पापांचा नाश होऊन त्याला विष्णुलोकात स्थान मिळेल. असा वर देखील भगवान विष्णूंनी दिला असल्याचं सांगण्यात आले आहे.