Utpatti Ekadashi 2019 Wishes and Messages: कार्तिक कृष्ण एकादशीला 'उत्पत्ती एकादशी' म्हणून ओळखले जाते. यंदा ही एकादशी 22 नोव्हेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे. दर महिन्याला येणार्या 2 एकादशींचे हिंदू पंचांगांमध्ये विशेष महत्त्व असते. यंदा कार्तिकी एकादशीनंतर साजरी केल्या जाणार्या उत्पत्ती एकादशीला देवी एकादशी प्रकट झाल्याने त्याचं विशेष महत्त्व आहे. उत्पती एकादशी ही उत्पन्ना एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. त्यामुळे हिंदू धर्मीयांंमध्ये या एकादशीचं व्रत पाळणार्यांना आज सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा, संदेश, ग्रीटींग्स पाठवून आजच्या उत्पत्ती एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा शेअर करू शकता. Utpanna Ekadashi 2019: उत्पत्ति एकादशी निमित्त जाणून घ्या व्रत, कथा, पूजाविधी आणि शुभ मुहूर्त.
पुराणातील कथेनुसार, 'एकादशी' ही एक देवी असून तिचा जन्म भगवान विष्णूमुळे झाला होता. ही एकादशी कार्तिक कृष्ण एकादशी या दिवशी प्रकट झाल्याने तिचे नाव 'उत्पत्ति एकादशी' असे पडले. या दिवशी एकादशीचं व्रत आणि उपवास करण्याची प्रथा आहे. तसेच मांसाहार वर्ज्य केला जातो.
उत्पत्ती एकादशीच्या शुभेच्छा
उत्पत्ती एकादशी पासून भाविक इच्छा प्राप्ती व्हावी,मोक्ष मिळावा म्हणून एकादशीच्या व्रताला सुरवात करू शकातात, कारण या एकादशी पासून वर्षभराच्या एकादशी व्रतास प्रारंभ होत असल्याचे मानण्यात येते. वर्षभरात सामान्यपणे 24 एकादशी येतात.