
Tulsi Vivah 2021 Messages: हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला देवउठनी एकादशी साजरी केली जाते. याला हरिप्रबोधिनी एकादशी आणि देवोत्थन एकादशी नावाने सुद्धा ओळखले जााते. काही ठिकाणी देवउठनी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो. त्याचसोबत याच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला तुळशी विवाहचा उत्सव धूमधाम साजरा केला जातो. या दिवशी तुळस आणि शाळीग्रामचा विवाह लावला जातो. शाळीग्राम हे भगवान विष्णूचे रुप असल्याचे मानतात तर तुळशीला देवी लक्ष्मीचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. तुळशीच्या झाडाला या दिवशी एका नवरीप्रमाणे सजवले जाते.
हिंदू धर्मात साजरा करण्यात येणाऱ्या सणांपैकी तुळशी विवाहाचे सुद्धा खास महत्व आहे. तर यंदाच्या तुळशी विवाह निमित्त मराठमोळे Messages, Wishes, WhatsApp Status, Facebook Post, Images पाठवून द्या शुभेच्छा!





तुळशी विवाहासंबंधित पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू यांनी जालंधरचे रुप धारण करुन वृंदाला स्पर्श करत तिचा पतिव्रता धर्म तोडला होता. त्यामुळे वृंदाचा पती जालंधर हा युद्धात मारला गेला. श्रीहरी द्वारे छळ आणि पतिच्या वियोगामुळे दु:ख झालेल्या वृंदाने त्यांना दगडात रुपांतर होईल असा श्राप दिला आणि स्वत: सती झाली. तर वृंदाने ज्या ठिकाणी आपला देहत्याग केला तेथेच तुळशीचे झाड आले. या श्रापातून मुक्त होण्यासाठी विष्णुजी शाळीग्राम झाले आणि त्यांनी माता तुळशी सोबत विवाह केला. तेव्हापासून तुळशी विवाहची ही परंपरा सुरु झाली आहे.