Simple Tulsi Vivah Rangoli Designs : तुळशी विवाहाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. तुळशी विवाह पार पडल्यानंतर लग्नाचे मुहूर्त काढण्याची पद्धत आहे. येत्या शनिवारी तुळशी विवाह संपन्न होणार आहे. या दिवशी रांगोळीचे अनन्य साधारण महत्त्व आहे. दिवाळीचा सण संपेपर्यंत दारासमोर रांगोळी (Rangoli) काढण्याची प्रथा आहे. अलिकडे सणानुसार विशेष रांगोळी काढली जाते. दिवाळीला दिव्यांची रांगोळी, भाऊबीजेला स्पेशल भाऊ-बहिणीची रांगोळी तर तुळशी विवाहाच्या दिवशी स्पेशल तुळशी वृंदावन असलेली रांगोळी काढली जाते. यंदा तुम्हीही तुळशी विवाहानिमित्त स्पेशल तुळशी वृंदावन असलेली रांगोळी काढण्याचा विचार करत असाल, तर हा खास लेख तुमच्यासाठी. (हेही वाचा - Tulsi Vivah 2019: तुळसी विवाह करण्याची ‘ही’ योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का?)
यावर्षी तुळशी विवाह सोहळा 9 नोव्हेंबरला सुरू होणार असून 12 नोव्हेंबरला त्याची समाप्ती होणार आहे. तुळशी विवाहामध्ये वधूच्या रूपात तुळशीला सजवून तिचा विवाह शाळीग्राम दगडाशी लावण्याची प्रथा आहे. शाळीग्राम हा विष्णू असल्याचं समजत जातं. काही ठिकाणी घरातील लहान मुलाचा तुळशीसोबात विवाह लावला जातो. या तुळशी विवाहाला तुम्हाला तुमचं अंगण आकर्षक रांगोळ्यांनी सजवायचे असेल, तर खालील व्हिडिओ तुमच्या नक्की उपयोगात येतील...
तुळशी विवाह स्पेशल रांगोळी डिझाईन्स -
अशाप्रकारे तुम्ही वरील रांगोळ्यांचे व्हिडिओ पाहून अगदी सोप्या पद्धतीने रांगोळी काढू शकता. तुळशी विवाहावेळी तुमची स्पेशल रांगोळी नक्की सर्वांचे लक्ष वेधून घेईल. तुळशीचे लग्न लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. म्हणजेच घरात धनधान्य, संपत्ती आणि इतर मालमत्ता वाढते. अर्थात याला अद्याप तरी वैज्ञानिक आधार प्राप्त झाला नाही. तुळशी विवाहावेळी तुळशीचे लग्न भगवान विष्णुसोबत लावले जाते. या दिवशी तुळशीला साडी नेसवली जाते. तसेच तुळशीभोवती ऊस, झेंडूची फुले, आवळा, चिंच आदींची मांडणी केली जाते. तसेच तुळशी रुंदावणासमोर आकर्षक रांगोळीही काढली जाते. तुळशीचा विवाह केल्याने भगवाण विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते. (सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)