Tulsi Vivah 2019 Mehndi Designs: तुळशी विवाह निमित्त काढा 'या' आकर्षक मेहंदी डिझाईन्स
Representative Image (Photo Credit - File Photo )

Tulsi Vivah Simple Mehndi Designs: आज संपूर्ण महाराष्ट्रात कार्तिकी एकादशी साजरी होत आहे. आजपासून १२ नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाहाचा (Tulsi Vivah 2019) मुहूर्त आहे. या दिवसांत तुम्ही तुमच्या अंगणातील तुळशीचं लग्न लावू शकता. तुळशी विवाह करणं हिंदू धर्मामध्ये शुभ मानलं जातं. या दिवशी तुळशीला नववधूप्रमाणे सजवले जाते. तसेच अगदी सनई चौघडे आणि मंगअष्टकाच्या सुरात तुळशी मातेचा विवाह लावला जातो. हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाह पार पडला की, लग्नाचा मुहूर्त काढायला सुरुवात होते. त्यामुळे अनेक मंडळी तुळशी विवाहाची वाट पाहून असतात. या दिवशी घरातील सर्वजण तुळशीच्या विवाहाची तयारी करत असतात. महिला मंडळ तर अगदी दोन ते तीन दिवसांपासून तयारीला लागलेली असतात.

तुळशी विवाहानिमित्त अनेक महिला हातावर मेहंदी काढतात. परंतु, प्रत्येक सणासाठी काढण्यात येणारी मेहंदी अगदीचं सर्वसामान्य वाटते. त्यामुळे तुम्ही तुळशीच्या लग्नानिमित्त खास मेहंदी काढणार असाल तर, हा लेख तुमच्या नक्की उपयोगात येईल. (हेही वाचा - Tulsi Vivah 2019: तुळशी विवाह करताना 'या' गोष्टी केल्यास वैवाहिक जीवनातील समस्या होतील दूर)

तुळशी विवाह स्पेशल मेहंदी डिझाईन्स -  

 

View this post on Instagram

 

#mehndidesigns #indianwedding #mehndioutfits #henna #weddinghenna #mehndiartist #indianwedding

A post shared by Tulsi mehandi (@tulsimehandi) on

 

View this post on Instagram

 

#hennatattoo #weddingmehndi #bridalmehndi #weddingmakeup #bridalmakeup #bridalwear #mehndioutfits #mehndi #traditionaltattoo

A post shared by Tulsi mehandi (@tulsimehandi) on

तुळशी विवाहावेळी तुळशीचे लग्न भगवान विष्णुसोबत लावले जाते. या दिवशी तुळशीला साडी नेसवली जाते. तसेच तुळशीभोवती ऊस, झेंडूची फुले, आवळा, चिंच आदींची मांडणी केली जाते. तसेच तुळशी रुंदावणासमोर आकर्षक रांगोळीही काढली जाते. तुळशीचा विवाह केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते.