Rishi Panchami 2024: हिंदू धर्मात ऋषीपंचमी (Rishi Panchami 2024) चा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. यंदा हे व्रत 8 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजेच आज पाळले जात आहे. हा दिवस सात ऋषींना समर्पित आहे. वैदिक कॅलेंडरनुसार, दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. हा दिवस सामान्यतः गणेश चतुर्थी आणि हरतालिका तीजच्या दोन दिवसांनी येतो. असे मानलं जातं की, हे व्रत केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात. हे व्रत केल्याने मोक्ष प्राप्त होतो.
ऋषी पंचमीचे महत्त्व -
ऋषीपंचमी हा सण नसून सप्तऋषी किंवा हिंदू संस्कृतीतील सात ऋषींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महिलांनी पाळलेला एक अतिशय महत्त्वाचा व्रत आहे. असे मानले जाते की हे व्रत केल्याने महिलांना मासिक पाळीच्या समस्यांपासून आराम मिळतो.
ऋषी पंचमी 2024 पूजा मुहूर्त -
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.37 वाजता सुरू होत असून ती दुसऱ्या दिवशी 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.58 वाजता संपेल. ऋषी पंचमीच्या पूजेचा मूहूर्त सकाळी 10:00 ते दुपारी 1:00 पर्यंत आहे.
ऋषी पंचमी पूजाविधी -
ऋषीपंचमीचे व्रत महिलांसाठी फार महत्वाचे आहे. धार्मिक मान्यतेनुसार ऋषीपंचमीच्या दिवशी सप्तऋषींचा सन्मान केला जातो. विशेषतः स्त्रिया ऋषीपंचमीला हे व्रत करतात. मासिक पाळीच्या वेळी झालेल्या पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी महिला हे व्रत करतात. या व्रतामध्ये ब्रह्मचर्य पाळले जाते. ऋषी पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे परिधान करावेत. पाटावर गंगाजलाने भरलेला कलश बसवावा. त्यानंतर त्यावर सप्तऋषींचे चित्र किंवा मूर्ती ठेवा. त्यानंतर धूप, दिवा, नैवेद्य दाखवा. ऋषी पंचमीच्या दिवशी ब्राह्मणांना दान अवश्य करा. त्यामुळे उपवासाचे परिणाम लवकर मिळण्यास मदत होते. या दिवशी अनेक लोक उपवास करतात.
(Disclaimer: येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धा, वास्तुशास्त्रावर आधारित आहे. लेटेस्टली मराठी याविषयी कोणत्याही प्रकारची पुष्टी करत नाही.)