Earth Hour 2025: आज रात्री 8:30 ते 9:30 या वेळेत जगभरात अर्थ अवर 2025 (Earth Hour 2025) साजरा केला जाईल. या वर्षी अर्थ अवरची थीम (Earth Hour Theme) 'निसर्गाची शक्ती', अशी आहे, जी आपल्याला निसर्गाच्या शक्तीची आणि त्याच्या संवर्धनाचे महत्त्व आठवून देते.
अर्थ अवर म्हणजे काय?
दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी अर्थ अवर साजरा केला जातो. या दिवशी, जगभरातील लोक, संस्था आणि प्रमुख स्मारके एक तासासाठी अनावश्यक दिवे आणि विद्युत उपकरणे बंद करतात. पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी या अर्थ अवरचे आयोजित केले जाते. (हेही वाचा -Solar Eclipse 2025 Date: वर्षातील पहिले सूर्यग्रहण कधी आहे? सुतक काळ कधीपासून सुरू होईल? जाणून घ्या)
भारतात दिवे बंद ठेवण्याची योजना -
अर्थ अवर दरम्यान भारतातील अनेक प्रमुख शहरे आणि प्रतिष्ठित इमारतींनी दिवे बंद ठेवण्याची योजना आखली आहे. या उपक्रमात गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट, हावडा ब्रिज आणि इतर अनेक ऐतिहासिक इमारतींचा समावेश केला जाईल. पर्यावरण कार्यकर्ते आणि संघटनांनी लोकांना या उपक्रमाचा भाग बनून निसर्ग वाचवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा -
अर्थ अवरची यंदाची थीम -
या वर्षीची अर्थ अवरची थीम 'निसर्गाची शक्ती' आपल्याला ऊर्जा, अन्न, पाणी आणि जीवन कसे प्रदान करते याबद्दल विचार करायला लावते. सध्या वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि हवामान बदलामुळे निसर्ग धोक्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश लोकांना निसर्गाप्रती संवेदनशील बनवणे आणि ते जतन करण्यासाठी प्रेरित करणे आहे.
अर्थ अवरमध्ये तुम्ही कसे सामील होऊ शकता?
- आज रात्री 8:30 ते 9:30 दरम्यान तुमच्या घरातील अनावश्यक दिवे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करा.
- #EarthHour2025 आणि #ThePowerOfNature या हॅशटॅग्जसह सोशल मीडियावर जागरूकता पसरवा.
- स्थानिक पर्यावरण मोहिमांमध्ये सहभागी व्हा आणि झाडे लावण्यासारखे उपक्रम हाती घ्या.
पर्यावरण तज्ञांच्या मते, अर्थ अवर ही केवळ एक तास अंधार पाळण्याची मोहीम नसून ती आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्याचा आणि शाश्वत जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश आहे.