![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/8-valentine-week-day-4-teddy-day-380x214.jpg?width=380&height=214)
Teddy Day 2025 Date in Valentine Week: व्हॅलेंटाईन वीक दरवर्षी 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो आणि 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करून या प्रेम साजरा करणाऱ्या आठवड्याची सांगता होते. व्हॅलेंटाईन वीक सध्या सुरु असून 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणार आहे. हा संपूर्ण आठवडा प्रेम आणि रोमान्ससाठी समर्पित आहे, प्रत्येक दिवसाचे विशेष आणि वेगळे महत्त्व आहे. व्हॅलेंटाईन आठवड्याचा चौथा दिवस टेडी डे साजरा केला जातो, जो दरवर्षी 10 फेब्रुवारीला येतो. या दिवशी, लोक त्यांच्या प्रियकर प्रेयसीला टेडी बेअर भेट देतात, जे काळजीचे प्रतीक मानले जाते. टेडी बेअर हे नात्यातील उत्कटता आणि आपुलकी दाखवण्याचा हा एक अनोखा मार्ग आहे. यामुळेच प्रेमी, मित्र आणि जवळचे लोक एकमेकांना टेडी भेट देऊन आपल्या भावना व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन वीकदरम्यान, विशेषत: व्हॅलेंटाइन वीकच्या चौथ्या दिवशी टेडी डे हा महत्वाचा बनला आहे. टेडी बिअर भेट देणे हि एक गोड भावना आहे. व्हॅलेंटाईन वीकचा एक खास दिवस म्हणून 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा टेडी डे हा एक खास प्रसंग आहे.
इतर भेटवस्तूंप्रमाणे, टेडी बिअर जवळीकतेचे प्रतिक बनले आहे. टेडी डे प्रेमी आणि जोडप्यांना त्यांच्यातील भावनिक बंध मजबूत करण्यासाठी आणि त्यांचा व्हॅलेंटाइन वीक अधिक संस्मरणीय बनविण्यासाठी एक चांगली संधी देते. व्हॅलेंटाईन वीक ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला असून १४ फेब्रुवारीला संपतो. प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक विशिष्ट अर्थ आणि महत्त्व आहे, दररोज प्रेमाची भावना वेगळ्या पद्धतीने व्यक्त केली जाते. कधी फुल देऊन, कधी चॉकलेट देऊन, कधी प्रपोज करून प्रत्येक दिवसाचे एक वेगळे महत्व आहे.
तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेगवेगळ्या पद्धतीने टेडी देऊ शकता. हा दिवस आणखी खास बनव्यासाठी तुम्ही त्यांना डेट वर घेऊन जाऊ शकता. सध्या फुलांचे आणि चॉकलेटचेहि टेडी बाजारात मिळतात. तुम्ही ते हि भेट म्हणून देऊ शकता.