Swami Vivekananda Quotes: : स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांची आज पुण्यतिथी. (Swami Vivekananda Punyatithi 2022) अध्यात्मिक गुरु, प्रखर बुद्धवादी, धर्मशास्त्राचे प्रखंड ज्ञान असलेले स्वामी विवेकानंद हे गुरु रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. विवेकानंद यांचा जन्म कोलकाता येथे 12 जानेवारी 1863 मध्ये झाला. लहानपणी त्यांना नरेंद्र दत्त नावाने ओळखले जायचे. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे युवकांना एक प्रकारचा आदर्शच. त्यांचे विचार (Swami Vivekananda Motivational Quotes) अनेकांसाठी आजही प्रेरणादायी ठरतात. वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी कौटुंबीक, वैवाहीक आणि भौतिक सुखांचा त्याग केला. त्यांनी संन्यास घेतला. त्यांना हिंदू धर्म आमि अध्यात्म याबाबत प्रचंड आवड होती. ईश्वराच्या शोधात निघालेल्या विवेकानंद यांची भेट रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली. परमहंसांना त्यांनी गुरु मानले. पुढे त्यांनी विचारांनी अवघ्या जगाला मोहीत करुन टाकले. असा या स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार जाणून घ्या खास त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त.
- स्वामी विवेकानंदांचे विचार
स्वामी विवेकानंदांच्या मते सर्व प्राणिमात्र शिवाचे अंश आहेत, त्यामुळे 'शिवभावे जीवसेवा' हे रामकृष्ण यांचे वचन आयुष्यभर पाळले. (हेही वाचा, आयुष्यात प्रेरणा आणि बळ देणारे स्वामी विवेकानंदांचे सकारात्मक विचार!)
- प्रत्येक जीव हा मूळ रूपातच ईश्वरी आणि दैवी आहे.
अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे.
- कर्म,पूजा किंवा मानसिक नियंत्रण किंवा तत्त्वज्ञान यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करून मुक्ती मिळवली पाहिजे.
- उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.
स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत आयोजित जागतिक धर्म परिषदेत ऐतिहासिक भाषण केले. ज्यामुळे स्वामी विवेकानंदांसोबतच हिंदू धर्म आणि भारताचे नाव जगात अध्यात्मिक दृष्टीकोनातून प्रसिद्ध पावले.आपल्या प्रेरणादायी भाषणांमुळे ते युवकांमध्ये प्रचंड प्रसिद्ध होते. दुर्दैवाने वयाच्या 39 व्या वर्षीच त्यांचे 4 जुलै 1892 मध्ये ध्यानस्त असताना त्यांचे निधन झाले. त्यांनी समाधी घेतली. आजही त्यांचे विचार अनेकांना प्रेरणा देतात.