ST Bus For Ganesh Chaturthi

ST Bus For Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थी निमित्त कोकणातील बसेस तुडुंब भरल्या आहेत. त्यासाठी आता एसटी महामंडळाने कोकणासाठी जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश चतुर्थीला मुंबईतील अनेकजण कोकणात जातात. त्यासाठी ज्यादा कोकणात बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्या बसेसना कोकणात जाणाऱ्या नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एकूण 4953 बसेस भरल्या आहेत. त्यामुळे उद्यापासून कोकणासाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात जाण्यासाठी एसटीची सर्वाधिक तिकिटे आरक्षित झाली आहेत. त्यामुळे4953 बसेस फुल्ल झाल्या आहेत. हे देखील वाचा: Ganesh Chaturthi 2024 Rangoli Design: गणेश चतुर्थीनिमित्त काढता येतील अशा आकर्षक रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ

गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने ३ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या कालावधीत ५ हजार बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेसमध्ये राखीव जागांसह महिला आरक्षणाचाही समावेश करण्यात आला आहे.

३ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील प्रमुख बसस्थानकांवरून या बसेस सोडण्यात येणार आहेत. दरवर्षी एसटी महामंडळ कोकणासाठी बसेस सुरू करते. यावेळी एसटी महामंडळ विक्रम मोडीत काढत एकूण पाच हजार बस सोडणार आहे. या काळात एसटी कर्मचारी नागरिकांसाठी रात्रंदिवस काम करणार आहेत. यासोबतच कोकणातील राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी बसेसच्या दुरुस्तीसाठी पथकेही उपस्थित राहणार आहेत.