Shiv Jayanti 2019 Tithi Wishes: महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) नेहमीच वंदनीय आहेत. मात्र त्यांच्या जयंतीच्या तारखेवरुन वाद असल्याने महाराष्ट्रात काही ठिकाणी तारखेनुसार 19 फेब्रुवारी दिवशी शिवाजी महाराज जयंती केली जाते. तर काही ठिकाणी फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी तिथीनुसार शिवजयंतीचा उत्सव साजरा केला जातो. पण संभाव्य तिथीमध्ये वैशाख शुद्ध द्वितीया (Vaishakh Shuddha Dwitiya) या दिवसाचाही उल्लेख असल्याने महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशीही शिवजयंती साजरी केली जाते. या तिथीनुसार यंदा 6 मे रोजी शिवजयंतीचा उत्सव साजरा केला जाईल.
तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या या शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं. फेसबुक, व्हॉट्सअॅप स्टेटस किंवा इतर सोशल मीडियाद्वारे हे संदेश शेअर करुन तुम्ही शिवबांधवांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता. (वैशाख शुद्ध द्वितीया नुसार यंदा कधी साजरी होणार शिव जयंती?)
शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी भाषेतील SMS, Wishes, Quotes, Images आणि शुभेच्छापत्रं...
सूर्य नारायण जर उगवले नसते तर,
आकाशाचा रंगच समजला नसता..
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर,
खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता…
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो!
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!
तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,
वाघ मराठी माझा !
सन्मान राखतो, जान झोकतो
तुफानं मातीचा राजा !
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,?
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात
त्यांना 'छत्रपती' म्हणतात !
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
इतिहासाच्या पानावर
रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती
मानाचा मुजरा
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सिंहाची चाल,
गरुडाची नजर,
स्रियांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण…
जय शिवराय!
शुभेच्छा संदेश व्हिडिओ:
शिवजयंती निमित्त महाराष्ट्रासह देशा-परदेशातही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शिवजयंतीचा उत्सव कधीही साजरा होत असला तरीही महत्त्वाचे आहे ते म्हणजे महाराजांचे गुण, कर्तृत्व आणि विचार. ते आपण अंगिकारण्याचा आणि पुढील पीढीपर्यंत पोहचवण्याचा नक्की प्रयत्न करुया.