Shiv Jayanti Tithi 2021 Messages: शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेजेस, Wishes, Quotes शेअर करुन साजरा करा महाराजांचा जन्मदिन!
Shiv Jayanti Tithi 2021 Messages | File Image
Shiv Jayanti Tithi 2021 Marathi Messages: हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार उद्या जयंती. खरंतर शिवजयंती साजरी करण्यामागे वाद आहेत. त्यामुळे शिवजयंती दोनदा साजरी केली जाते. एकदा तारखेनुसार, 19 फेब्रुवारी रोजी तर एकदा तिथीनुसार, फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजयंती साजरी केली जाते. उद्या, बुधवार, 31 मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाईल. शिवजयंती निमित्त महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यंदा कोविड-19 संकाटाचे सावट असल्याने सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसंच सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहनही सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे.
परंतु, सध्याच्या डिजिटल युगात फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) यांसारख्या सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून शुभेच्छापत्रं शेअर करुन शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी खास मराठी शुभेच्छा, Wishes, Messages, Quotes तुम्ही आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी किंवा प्रियजनांसोबत शेअर करु शकता. (Shiv Jayanti 2021 Wishes in Marathi: शिवजयंतीच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारे देऊन शिवछत्रपतींचा जन्मोत्सव साजरा!)

शिव जयंती शुभेच्छा!

जगणारे ते मावळे होते

जगवणारा तो महाराष्ट्र होता

पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून

जनतेवरुन मायेने हात फिरवणारा

राजा छत्रपती होता

शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Shiv Jayanti Tithi 2021 Messages | File Image

प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,

दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,

धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,

हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shiv Jayanti Tithi 2021 Messages | File Image

इतिहासाच्या पानावर,

रयतेच्या मनावर,

मातीच्या कणावर आणि

विश्वासाच्या प्रमाणावर,

राज्य करणारा राजा म्हणजे,

राजा शिवछत्रपती..

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shiv Jayanti Tithi 2021 Messages | File Image

निधड्या छातीचा

दनगड कणांचा

मराठी मनांचा

भारत भूमीचा राजा

छत्रपती शिवाजी

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shiv Jayanti Tithi 2021 Messages | File Image

भवानी मातेचा लेक तो,

स्वराज्याचा राजा होता..

झुकला नाही कोणासमोर,

मुघलांचा बाप होता…

छत्रपती शिवाजी महाराज

यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

Shiv Jayanti Tithi 2021 Messages | File Image
छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, शौर्य, चातुर्य, बुद्धीमत्ता सर्वश्रुत आहे. शिवजयंती निमित्त त्यांचे थोर विचार, कर्तृत्व पुढील पीढीपर्यंत पोहचवूया आणि त्यांचे गुण अंगिकारण्याचा प्रयत्न करुया. शिवरायांना हीच खरी मानवंदना ठरेल.