Happy Women's Day 2023 Wishes In Marathi: जागतिक महिला दिवस दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. 1908 साली न्यूयॉर्कमध्ये काढण्यात आलेल्या रॅलीचा महिला दिन साजरा करण्यामागे महत्त्वाचे योगदान आहे. त्यावेळी 12 ते 15 हजार महिलांनी न्यूयॉर्कमध्ये रॅली काढली. नोकरीचे काही तास कमी करावेत, अशी या रॅलीत महिलांची मागणी होती. यासोबतच त्यांना त्यांच्या कामानुसार मानधनही देण्यात यावे. यासोबतच या लोकांना मतदानाचा अधिकार मिळावा, अशीही मागणी करण्यात आली. या चळवळीच्या एका वर्षानंतर, अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने पहिला राष्ट्रीय महिला दिन जाहीर केला.
नंतर 1911 मध्ये डेन्मार्क, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, जर्मनी येथे पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. यानंतर, 8 मार्च 1975 रोजी संयुक्त राष्ट्र संघाने अधिकृतपणे महिला दिनाला मान्यता दिली. तेव्हापासून हा दिवस विशेष थीमसह साजरा केला जात आहे. जागतिक महिला दिनानिमित्त Messages, Quotes, Images, Greetings शेअर करत महिलांच्या कर्तृत्वाला खालील मेसेज पाठवून सलाम करा. तुम्ही या ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू
झाशीची राणी, मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू…
Happy Women’s Day!!
ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे,
ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे,
ती माया आहे, ती सुरूवात आहे
आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
तू भार्या, तू भगिनी,
तू दुहिता, प्रत्येक वीराची माता,
तू नवयुगाची प्रेरणा
या जगताची भाग्यविधाता.
महिला दिनाच्या शुभेच्छा!
जेव्हा तु माझा हात हातात घेऊन उभी असतेच
मला जग जिंकल्याचा भास होतो.
तुझ्या असण्याने माझं अस्तित्व बहरून निघतं.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
सुखदुःखात साथ देतेस,
थकत नाहीस कधीच,
आयुष्य माझं अधुरे तुझ्याविणा,
साथ सोडू नको कधीच
महिला दिनाच्या शुभेच्छा!
आज जागतिक महिला दिनानिमित्त
सगळ्या माझ्या बहिणींना, युवतींना,
विविध पातळीवर यशाची उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना,
शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या
माझ्या कष्ट करणाऱ्या बहिणींनाही
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
समाजात महिलांना समान अधिकार मिळावेत, प्रत्येक महिलेला त्यांचे हक्क मिळवून देणे तसेच कोणत्याही क्षेत्रात महिलांशी होणारा भेदभाव रोखण्याच्या उद्देशानेही हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी महिलांच्या हक्कांकडे लोकांचे लक्ष वेधून त्यांना जागरुक करण्याच्या उद्देशाने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.