Shani Jayanti 2019: शनि जयंती का साजरी केली जाते? जाणून घ्या त्यामागील कारणे
Shani Image (Photo Credits: Facebook)

हिंदू धर्मातील 33 कोटी देवांपैकी असा एक देव ज्याची भक्तांच्या मनात भीती असते, ज्याची साडेसाती लागली तर आपल्या आयुष्यावर विपरित परिणाम होतो असे लोकांचा समज असतो. मग या शनिला प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक नानाविध उपाय करतो. या शनिदेवाची येत्या 3 जूनला जयंती आहे. शनि जयंती या दिवसाला शनि अमावस्या असेही म्हणतात. चला तर पाहूया का साजरी केली जाते ही शनि जयंती...

का साजरी केली जाते शनि जयंती:

ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला शनि जयंती साजरी केली जाते. ह्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्यास आपण शनिच्या कोपातून वाचू शकते. तसेच जर कोणाच्या मागे शनिची साडेसाती लागली असेल तर त्यांच्यासाठी शनी जयंतीचा दिवस खूपच शुभ मानला जातो. असं म्हणतात की, शनि या ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीपेक्षा 95 पटीने जास्त गुणकारी मानली जाते. ह्याच गुरुत्वाकर्षणाच्या जोरावर आपले चांगले आणि वाईट विचार चुंबकीय शक्ती ने शनि ग्रहापर्यंत पोहोचतात. ज्यांच्या कृत्यानुसार त्याचा परिणामही त्वरित पाहायला मिळतो. मात्र जर तुम्ही कुठलेही वाईट कृत्य केले नसेल तर तुम्हाला शनिला घाबरायची गरज नाही. कारण शनि भल्या माणसांच्या मागे कधीच नसतो.

काय करावे शनि जयंती दिवशी:

1. या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या शनि देवाच्या मूर्तीवर तेल चढवतात.

2. मुंग्यांना काळे तीळ आणि गूळ खायला देतात

3. पिंपळाच्या झाडात केशर, चंदन,फूल आदि गोष्टी अर्पण करतात

4. चामड्याच्या चप्पला गरीबांना दान करा

Hanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)

थोडक्यात,  शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी शनि जयंती हा खूप शुभ दिवस आहेत. तसेच तुमच्या मागे असलेली साडेसाती दूर करायची असेल, तर शनिची मनोभावे पूजा-प्रार्थना अवश्य करा.