
Shahu Maharaj Jayanti 2022 Messages: 26 जून 1874 रोजी जन्मलेले शाहूजी महाराज (Shahu Maharaj Jayanti 2022) 2 जुलै 1894 रोजी कोल्हापूरचे राजे झाले. शाहू महाराज असे राजे होते ज्यांनी राज्य आणि समाजावरील ब्राह्मणांचे वर्चस्व मोडून काढले. शाहू महाराजांनी 26 जुलै रोजी चित्पावन ब्राह्मणांच्या तीव्र विरोधानंतर आपल्या राज्यातील कोल्हापुरात दलित आणि मागासवर्गीयांसाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण लागू केले.
आधुनिक भारतातील जातीच्या आधारावर हे पहिले आरक्षण होते. म्हणूनच शाहू महाराजांना आधुनिक आरक्षणाचे जनक म्हटले जाते. पुढे डॉ. बाबासाहेबांनी भारतीय संविधानात शाहू महाराजांनी लागू केलेल्या आरक्षणाचा विस्तार केला. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त Wishes, Greeting, Whatsapp Status, Images च्या माध्यमातून लोकराजाच्या पावन स्मृतीस त्रिवार अभिवादन नक्की करा. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
सामाजिक न्यायाचे, आरक्षणाचे जनक
छत्रपती राजर्षी शाहू महाराज
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
तसंच राज्यातील सर्वांना
'सामाजिक न्याय दिना’च्या शुभेच्छा!

भटक्या, विमुक्त जमातींचे
आधारस्तंभ
छत्रपती राजर्षी शाहू महाराज
यांच्या जयंती निमित्त अभिवादन!

आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने अपेक्षीत,
वंचित समाजासाठी वापरणारे
आरक्षणाचे प्रणेते…
लोकराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज
यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

समता, बंधुता यांची शिकवण
देणारा लोकराजा छत्रपती शाहू
महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार अभिवादन!

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व
स्फूर्ती स्थान, श्रीमंत छत्रपती
शाहू महाराजांना, त्रिवार मानाचा मुजरा…
सर्व शिवभक्तांना, शाहू महाराज शिवमय शुभेच्छा!

छत्रपती शाहू महाराजांनी समता, न्याय आणि बंधुतेवर आधारित समाज निर्माण केला. छत्रपती शाहू महाराज हे असे राज्यकर्ते होते ज्यांनी समाजातील मागासलेल्या आणि शोषित घटकांच्या वेदना तर समजून घेतल्याच पण त्यांच्या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांनी दलित वर्गातील मुलांना शिक्षण देण्यासाठी अनेक कामे केली. त्यांना मोफत शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व्यवस्था केली आणि बाहेरील विद्यार्थ्यांनाही राहण्याची व्यवस्था केली.